'भिडेवाडा'चं पाहिलं पोस्टर रिजिल; सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत...

भिडेवाडा येथे महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. आणि स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे भिडेवाडा हा केवळ वास्तू न राहता स्त्री शिक्षणाच्या संघर्षाची आणि बदलाची साक्ष ठरली आहे. हाच ऐतेहासिक भिडेवाडा आता चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फ्लिम प्रस्तुत 'भिडेवाडा' या सामाजिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले आहे. त्याचसोबत निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी सांभाळली आहे. तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.


या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका धीरेसे जोशी यांनी साकारली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर, समद खान, प्रतिभा भागात, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे, पंकज चव्हाण आणि अनिरुद्ध देशपांडे हे कलाकार आहेत.

Comments
Add Comment

धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ

बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना

Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत

Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ५८ वर्षांची असूनही माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा कट उघड, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई - हिंदी सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथे असलेल्या 'शेट्टी टॉवर' घरावर झालेल्या गोळीबार