मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू घेऊन जात असलेला टँकर उलटला. टँकरमधून वायू गळती सुरू झाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही तासांसाठी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. काही काळानंतर एका बाजूने वाहतूक सुरू झाली. पण तोपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी ३० तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी सुटलेली नाही. कोंडी सुटण्याआधीच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पेट्रोलने भरलेल्या टँकरला अपघात झाला. या अपघातामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.


बुधवारी रात्रीच्या सुमारास टोनी धाब्याजवळ पेट्रोलचा टँकर आणि एका भरधाव कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, पेट्रोलचा टँकर हा महामार्गावरून खाली उतरला. या अपघातात दोन्ही पेट्रोलच्या टँकरचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर कंटेनरच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. अपघातग्रस्त पेट्रोलचा टँकर आणि कंटेनर हटवण्याचं काम सुरू आहे.


आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या टँकरमधील प्रोपिलीन वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम पण सुरू आहे. पण दोन अपघातांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि महामार्ग प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सुरक्षिततेचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच महामार्ग पूर्णपणे खुला केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)


माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त) कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.

Comments
Add Comment

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे छापे

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले.

NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट मुंबई : सिंधुदुर्ग,

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार

Pandharpur Acid attack : धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार

- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संताप राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत