अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय


१०० विद्यार्थी प्रवेश
⁠४३० खाटांचे रुग्णालय
तीन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याची अट
जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतर


मुंबई : अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे, अमरावती जवळील आलियाबाद येथील ११.२९ हेक्टर जमिनीचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली. याबाबतचा निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.


या जागेवर १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. या महाविद्यालयाला संलग्न ४३० रुग्णखाटांचे अद्ययावत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या नियोजित प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जमीन 'भोगवटादार वर्ग-२' या धारणाधिकाराने मूल्यरहित आणि कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे. जमिनीच्या वापराबाबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.महसूल विभागाच्या परवानगीशिवाय या जमिनीची विक्री, देणगी, गहाण किंवा कोणत्याही खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हस्तांतरण करता येणार नाही.


" या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्याना मोठी संधी उपलब्ध होईल.जिल्ह्यातील नागरिकांची ही मागणी होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळू शकले. आरोग्यसेवा म्हणजे ईश्वरसेवा, हा सरकारचा ध्यास आहे. पालकमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. " - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, पालकमंत्री अमरावती

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक