धक्कादायक! टायगर पॉईंटवर मुंबईच्या मुलीने केली आत्महत्या; खरं कारण आलं समोर

पुणे : सोलो ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा १ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट या परिसरात आढळून आलेल्या मुंबईतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. ४०० फूट खोल दरीत सापडलेल्या मृतदेहाच्या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती नसून आत्महत्येचा असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.


मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पटी (वय १९) असे असून ती मुंबईतील रहिवासी होती. श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाला फिरण्याची आवड असल्याने ती लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी गेली होती. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र घटनास्थळाची पाहणी, पंचनामा आणि इतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.


पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेया काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कौटुंबिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिची मानसिक स्थिती अस्थिर झाल्याचे तपासात आढळले. फिरण्याची आवड असल्याने तिने घरी लोणावळ्यात ट्रेकिंगला जाते असे सांगून टायगर पॉइंटवर आत्महत्या केली.


घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू पथक, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे ३९० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला, घटनास्थळाच्या आसपास तिच्या वैयक्तिक बॅगेत ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांना आढळले असून त्याआधारे तिच्या घरच्यांशी पोलिसांनी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल आमी लॅपटॉप उपकरणे अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून तिच्या शेवटच्या हालचाली आणि संवादाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.


लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थिती पाहता आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूमागील सर्व पुरावे तपासल्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा