Manjusha Nagpure : पुण्याचे महापौरपद सिंहगड रोडकडे! मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड; भाजप-राष्ट्रवादीच्या 'मैत्री'मुळे निवडणूक केवळ औपचारिकता

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) नव्या महापौर म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा पुण्याचे महापौरपद भूषवण्याचा मान पहिल्यांदाच सिंहगड रोड परिसराला मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिक बाग) येथून सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपुरे या यंदाच्या निवडणुकीतही बिनविरोध निवडून आल्या होत्या. पुणे महापालिकेची ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर, महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. या निर्णयाचा मान राखत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मंजूषा नागपुरे यांचा मार्ग सुकर झाला. मंजूषा नागपुरे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सलग तीन वेळा मिळालेला विजय लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता केवळ निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता बाकी असून, लवकरच त्या अधिकृतपणे पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणून पदभार स्वीकारतील.



पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची घोषणा


महापौरपदासाठी भाजपच्या मंजूषा नागपुरे तर उपमहापौरपदासाठी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, या निवडीनंतर कोणताही जल्लोष न करण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय भाजपने घेतला आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यात सध्या शोककळा आहे. या पार्श्वभूमीवर, निवडीचा आनंद साजरा करताना कुठेही फटाके वाजवू नका किंवा गुलाल उडवू नका, अशा कडक सूचना भाजपच्या सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर शहरात कुठेही विजयाचे बॅनर्स लावू नयेत, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी यासंदर्भात सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करत, परिस्थितीचे गांभीर्य राखण्याचे आवाहन केले आहे. राजकीय प्रक्रिया म्हणून ही निवड केली जात असली तरी, शहरात असलेल्या दु:खाच्या वातावरणामुळे अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.



पुणे महापालिकेत 'महिला राज'


भाजपने या निवडणुकीत महिला सक्षमीकरणावर भर देत तब्बल ११९ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यापैकी ५० पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत, जे पुणे महापालिकेच्या इतिहासातील एक मोठे यश मानले जात आहे. पुण्याच्या प्रथम नागरिक होण्यासाठी अनेक अनुभवी नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांची नावे आघाडीवर होती. शेवटी पक्षाने मंजूषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी, या विजयाने पुणे महापालिकेत खऱ्या अर्थाने 'महिला राज' आल्याचे चित्र दिसत आहे.



अजित दादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार


पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.



पुणे महापालिका निकाल



  • एकूण जागा १६५

  • भाजप- ११९

  • शिवसेना -०

  • ऊबाठा-१

  • राष्ट्रवादी शरद पवार -३

  • राष्ट्रवादी अजित पवार -२७

  • काँग्रेस -१५

  • एमआयएम-०

  • अपक्ष-०

  • इतर -०

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा