Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी माहिती हाती आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अर्चना पाटील सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहे. मागील दोन दिवसांपासून त्या मुंबईत होत्या. त्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.


अजित पवार चार्टर विमानाने मुंबईहून बारामतीला चालले होते. या विमानाला सकाळी ८.४५ च्या सुमारास अपघात झाला. बारामती येथील धावपट्टीजवळ विमान कोसळले. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताआधी अजित पवारांनी फोन केला होता. ही माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दिली आहे.


राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर एनडीए आणि राज्य पातळीवर महायुतीत सहकारी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात बोलताना अर्चना पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.


अजित पवारांनी स्वतः फोन करुन मी येऊ शकत नाही, पण मंत्री दर्जाच्या माणसाला पाठवतो असे आश्वासन दिले होते, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.


पवार कुटुंबाला मोठं दुःख झालं आहे. सुनेत्रा आत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. निश्चित अभिमान आहे. तेरची मुलगी ही राज्याची उपमुख्यमंत्री झाली आहे. सुनेत्रा आत्यांनी यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम केलं आहे. काटेवाडी निर्मल गाव योजना त्यांनी राबवली आहे. त्या कायम जितदादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लग्न झाल्यापासून मागील ४० वर्षांपासून त्या काम करत आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे की, घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असले पाहिजे. पण हा निर्णय २० वर्षांपूर्वी सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत राबवला होता. महिलेला घरातून बाहेर काढू नये, म्हणून सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत हा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची दखल घेऊन राज्य शासनाने तो पूर्ण महाराष्ट्रात अंमलात आणला आहे. त्यांना गोरगरिब महिलांची जाण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून आधार वाटतोय. सगळ्या महिला आशेनं पाहत आहेत; असंही अर्चना पाटील म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील हे गावचे सरपंच होते. घरात लोक प्रश्न घेऊन यायचे. त्यामुळे त्यांनी घरात लोकांच्या समस्या कशा सोडवतात हे जवळून पाहिलं आहे. त्या जास्त बोलत जरी नसल्या तरी योग्य निर्णय घेण्यास त्या सक्षम आहेत, असंही अर्चना पाटील म्हणाल्या.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "