संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला


नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संगमेश्वर तालुक्यातही या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. तालुक्यातील तीन जि. प. गटांत हायहोल्टेज लढती होणार आहेत. यामध्ये कोसुंब, कसबा आणि साडवली या जि. प. गटात काँटे की टक्कर होणार आहे. साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने व माजी जि. प. अध्यक्षा रश्मी कदम, कोसुंब गटात माजी आमदार सुभाष बने व कसबा गटात शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये साडवली, कोसुंब, कसबा, कडवई, दाभोळे, मुचरी, धामपूरतर्फे संगमेश्वर यांचा समावेश आहे. साडवली गटातून उबाठाच्या नेहा रवींद्र माने व भाजपच्या रूपाली रूपेश कदम, कोसुंब गटातून भाजपचे प्रमोद अधटराव, शिवसेनेचे रोहन सुभाष बने व उबाठाच्या मुग्धा जागुष्टे, कसबा गटातून शिवसेनेच्या रचना राजेंद्र महाडिक व उबाठाच्या विशाखा कुवळेकर, कडवई गटातून भाजपचे विनोद म्हस्के व उबाठाचे संतोष थेराडे, दाभोळे गटातून शिवसेनेचे विलास चाळके व वंचितच्या विरश्री बेटकर, मुचरी गटातून शिवसेनेच्या माधवी गीते, उबाठाच्या ललिता तांबे, धामापूरतर्फे संगमेश्वर गटातून राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे सुशिल भायजे व उबाठाचे सहदेव द बेटकर यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. या सात गटापैकी साडवली, कोसुंब व कसबा या तीन गटांमध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. साडवली गटातील उमेदवार नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या यापूर्वी जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा.....

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

कोकणच्या विकासासाठी निधीचा धडाका; गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - गृहमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक