Rohit Shetty: गोळीबार प्रकरणानंतर रोहित शेट्टीने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मुंबई: बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शनिवारी (३१ जानेवारी) रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मुंबई गुन्हे शाखाने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाकडून या चारही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुभम लोणकर याला या प्रकरणात फरार आरोपी घोषित केले आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार त्यांनी त्यांचे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना पुढील ४८ तास घरी येऊ नये, अशी विनंती केली आहे.



नेमकं काय घडलं?


दुचाकीवरून आला अन्...


शनिवारी रात्री उशिरा एका अज्ञात तरुणाने हा गोळीबार केला असून, यामध्ये रोहित शेट्टी यांच्या बंगल्याच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टीच्या बंगल्याबाहेर आला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने 'हुडी' घातली होती. बंगल्याजवळ थांबताच त्याने अचानक बंदूक काढून थेट घराच्या दिशेने ४ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात खिडकीच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कृत्य केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच तो तरुण दुचाकीवरून वेगाने पसार झाला.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल :


गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या ताफ्याचा आणि तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Comments
Add Comment

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय