सुप्रभात

संत नामदेव

पांढरे दूधही पांढरे । चवी जेवणारे जाणविते ॥
केळाच्या पाटीवर ठोविला दोडका । तोचि म्हणे विका तेणे मोले ॥
ढोर म्हणती आम्हा हाकारलास । वारुवा सारको खाऊ था घास ॥
मंदल्याजेती घरोघरी जाती । धृपदासाठी ताक मागती ॥
नामा म्हणे सोपी कवित्वे झाली फुका ।
हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥

आपल्या भोवतालची परिस्थती कशीही असली तरी सूज्ञ माणूस त्यातून योग्य त्या पर्यायाची निवड करतो आणि योग्य निर्णयाद्वारे आपले ईप्सित साध्य करतो. या अभंगात संत नामदेव म्हणतात, ताक आणि दूध दोघांचाही रंग पांढरा असतो. पण चवीने जेवणारांना त्यातला फरक ठाऊक असतो. केळ्यांच्या पाटीत दोडका ठेवला आणि तोही केळ्यांच्या भावाने विका असे म्हणणे चूक आहे. गुरेढोरे म्हणतात, 'आम्हाला भरपूर श्रम देऊन हाकारीत आणलत. आता अश्वाप्रमाणे आम्हालाही चाऱ्याचा घास घेऊ द्या. घरोघरी गायन करून भाटगिरी करणारे लोक धृपद गाण्यासाठी दुसरे काही नाही तरी ताक तरी द्या अशी मागणी करतात. ट ला ट लावून फुकाचे काव्य करणारे खूप झालेत. खरं तर आपलं आयुष्य सुखवत करायचे असेल तर 'हरि हरि' म्हणणे हाच महत्त्वाचा मंत्र आहे. कवितेच्या नावाने ट ला ट लावून रचना करणाऱ्या आणि त्या जोरावर आपला निर्वाह करणाऱ्या कवींवर संत नामदेवांनी कडक भाषेत प्रहार केले आहेत. आपल्या दर्जाहीन कवित्वाच्या जोरावर हे तथाकथित कवी सोन्याच्या मोलाने आपली माती विकावी अशा खटपटी लटपटी करतात. एखाद्या कवितेचे धृपद म्हणायचे असले तरी त्यासाठी घरोघर जाऊन पोटाची खळगी भरण्याचा उधोग करतात. खरंतर या कवींना अभिजात काव्याचा काहीच गंध नसतो. 'ना अभ्यास, 'ना व्यासंग, ना प्रामाणिक निष्ठा. त्यामुळे रचना करून त्याला लोकांनी काव्य म्हणावे आणि आपला सन्मान करावा अशी त्यांची अपेक्षा असते. केळी आणि दोडका यांचे रूप वेगळे, चव वेगळी, मात्र दोडक्याप्रमाणे असणारे लोक केळीच्या भावाने आपली गणना करावी, अशी अपेक्षा करतात. समाजातील ढोंगी आणि दिखाऊ लोकांच्या स्वार्थी प्रवृत्तीवर संत नामदेवांनी नेमके बोट ठेवले आहे.

Comments
Add Comment

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे