Thursday, March 26, 2026

BMC Election 2026 : शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 'या' विश्वासू नगरसेवकाची गटनेते पदी निवड

BMC Election 2026 : शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 'या' विश्वासू नगरसेवकाची गटनेते पदी निवड

मुंबई: शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या अमेय घोले यांची मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील २९ नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे.

अमेय घोले यांच्या निवडीमुळे पालिकेत प्रशासनावर पकड मिळवणे शिवसेना शिंदे गटाला सोपे जाईल, असे मानले जात आहे. या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेत आता शिवसेना शिंदे गट हा भाजपसोबत अत्यंत प्रबळ स्थितीत आला आहे.

महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली:

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता जवळ येऊन ठेपल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय मोठी मास्टर खेळी आहे. महापालिकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना खिंडार पाडले. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या एकूण ४ नगरसेवकांना आपल्या गटात खेचण्यात यश मिळवले आहे. या राजकीय भूकंपामुळे महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली असून महायुतीचा सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाकडे २९ नगरसेवक होते मात्र आता ही संख्या ३३ वर पोहोचली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे एकत्रित संख्याबळ आता १२२ इतके झाले असून ते बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा