सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्यांना फटका बसणार, काय आहे नवीन करप्रणाली?, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला वापरणाऱ्यांना आजपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून या उत्पादनांसाठी नवीन कररचना लागू केली आहे. या मागचा उद्देश नियंत्रण अधिक कडक करणे आणि ‘sin goods’वर कराचा भार कायम ठेवणे हा आहे. नव्या व्यवस्थेनुसार, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर पान मसाल्यावर हेल्थ आणि नॅशनल सिक्युरिटी सेस लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत या उत्पादनांवर 28 टक्के जीएसटी लागू होताना सुरू करण्यात आलेला कॉम्पेन्सेशन सेस आकारला जात होता. पण, ही जुनी करपद्धत आता बदलली आहे.


MRP आधारित करप्रणाली लागू
सरकारने तंबाखूजन्य काही उत्पादनांसाठी नवीन MRP-आधारित मूल्यांकन प्रणाली आणली आहे. यात चघळण्याची तंबाखू, फिल्टर खैनी, जर्दा (सुगंधित तंबाखू), गुटखा आदी उत्पादनांचा समावेश आहे. आता या उत्पादनांवरचा जीएसटी कारखान्यातील किंमतीवर नव्हे, तर थेट पॅकेटवर छापलेल्या किरकोळ किमतीवर (MRP) आधारित असेल. या बदलामुळे करचुकवेगिरी रोखण्यास मदत होईल आणि सरकारचा महसूल वाढेल, असा अंदाज आहे.


उत्पादकांसाठी नवीन नियम
नव्या कायद्यांतर्गत पान मसाला उत्पादकांना 1 फेब्रुवारीपासून नवीन नोंदणी (Registration) करावी लागणार आहे. याव्यतिरिक्त, कारखान्यातील सर्व पॅकिंग मशीन झाकतील असे CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज किमान दोन वर्षे जतन करावे लागणार आहेत. तसेच कारखान्यातील मशीनची संख्या आणि उत्पादन क्षमता याची माहिती उत्पादकांना उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागेल. जर एखादे मशीन सलग 15 दिवस बंद राहिले, तर त्या कालावधीसाठी उत्पादन शुल्कात सवलत मागण्याची मुभा उत्पादकांना देण्यात आली आहे.


नवीन बदलांनंतरही सरकारने हे स्पष्ट केले आहे की, पान मसाल्यावरचा एकूण करभार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. 40 टक्के जीएसटीसह एकूण कर सध्या ज्या पातळीवर आहे (सुमारे 88 टक्के), त्याच आसपास ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?