मंत्री छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये सोबत घेऊन येणार स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन


शोकसभेवेळी येवल्यात व नाशिकमध्ये दर्शनासाठी ठेवणार अस्थिकलश


नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी येवला व नाशिक येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सोबत घेऊन येणार आहे. हा अस्थिकलश येवला व नाशिक येथील शोकसभेच्या स्थळी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता येवला शहरातील माऊली लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस स्व.अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या शोकसभेस प्रमुख मंत्री, खासदार, आमदार व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या शोकसभेत स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व सर्व नागरिकांनी या शोकसभेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा