मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक

नवी मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक प्रामुख्याने रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी घेण्यात येत असून, यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.


मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या कालावधीत मेगा ब्लॉक असेल. या पाच तासांच्या काळात अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाड्या आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त सर्व स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप जलद गाड्या देखील धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आजचा रविवार अत्यंत कठीण जाणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन फेऱ्या पूर्णतः बंद राहतील.


प्रवाशांसाठी विशेष लोकलची सोय : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काही विशेष व्यवस्था केली आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या टप्प्यात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातील. तसेच, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्स-हार्बर मार्गावरून म्हणजे ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या