भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

विकासाभिमुख आणि व्यवहार्य अर्थसंकल्प


मुंबईच्या उद्योग व विकासवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प


भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत


मुंबई : मोदी सरकारने आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला विकासाभिमुख आणि व्यवहार्य असे संबोधून या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीच्या उदयोग व विकासवाढीला मोठी चालना मिळणार आहे. आजचा अर्थसंकल्प भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि कोविड-१९ मधून सर्वात वेगाने सावरणारी अर्थव्यवस्था ठरला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष व अंधेरी पश्चिमचे आमदार अमीत साटम यांनी दिली.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी बोलताना आमदार साटम म्हणाले की, अर्थसंकल्पामध्य देशात सात अतिवेगवान रेल्वे काॅरीडरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई-पुणे हा एक कॉरीडॉर आहे. यामुळे मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरातली वाहतूक सुलभ व जलद होणार आहे.


आमदार अमीत साटम यांनी अधोरेखित केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी जमिनीखाली रस्त्याचे जाळे विणणारा पाताळ लोक प्रकल्प घोषित केला आहे. हा महत्त्वाकांक्षी ७० किमी लांबीचा प्रकल्प भूमिगत बोगद्याचे जाळे असून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणार आहे. बोगद्यासाठी लागणाऱ्या टनल बोअरिंग मशिनसाठी आपण आयातीवर निर्भर होतो. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबीएम मशिनच्या स्थानिक उत्पादकांना करमाफी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे टीबीएम मशीनवरचे आपले चीन व इतर देशावरचे अवलंबीत्व संपणार असल्याचे आमदार साटम यांनी स्पष्ट केले.


आजच्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी SHE मार्ट उभारण्याचे जाहीर केले आहे. याचा स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना मोठा लाभ होईल. मोठ्या शहरांमध्ये १००० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या नगरपालिका बाँडना १०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. बृहन्मुंबई ही आशिया खंडातील मोठी व श्रीमंत महानगरपालिका आहे. या बाँड अनुदानाचा मुंबई महानगरपालिकेला मोठा लाभ होणार असल्याचा दावा आमदार अमीत साटम यांनी केला.


१५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला मोठी आर्थिक मदत केली जाई, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास (एमएसएमई) विकास इंजिन म्हणून स्थान दिले असून त्यासाठी 7 लाख कोटी रुपये विकास निधी जाहीर केला. या भरघोस निधीमुळे तसेच मुंबईतील उद्योग व विकास वाढीला आणखी चालना मिळणार असल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.


Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या