इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या लष्करी क्षमतेवर विशेष भर देत असल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे. यंदा भारताचा संरक्षण अर्थसंकल्प १४.८ टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो थेट ७.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डॉलरमध्ये हा खर्च सुमारे ९४ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे.


आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचे संरक्षण बजेट सुमारे ८१ अब्ज डॉलर होते. यंदा १०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याची अपेक्षा होती, मात्र तो थोडक्यात हुकला. तरीही या वाढीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक संरक्षण खर्च करणारा देश ठरला आहे. जगात फारच मोजके देश असे आहेत, ज्यांचा संरक्षण खर्च १०० अब्ज डॉलरच्या पुढे आहे. जागतिक पातळीवर पाहता, अमेरिका संरक्षण खर्चात अव्वल आहे. अमेरिकेचा लष्करी खर्च तब्बल १,०१ ट्रिलियन डॉलर (सुमारे ८४.५ लाख कोटी रुपये) इतका असून हा जगातील सर्वात मोठा आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील काळात हा खर्च १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव दिला आहे.


चीनचे संरक्षण बजेट जगात दुसऱ्या क्रमांकावर असून ते सुमारे २४९ अब्ज डॉलर आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, चीनचा प्रत्यक्ष लष्करी खर्च याहून अधिक म्हणजे ३१८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त असू शकतो. रशियाचा संरक्षण खर्च सुमारे १८७ अब्ज डॉलर असून युक्रेन युद्ध आणि आर्थिक निर्बंधांमुळे त्यांच्या बजेटवर मोठा ताण आला आहे.


युरोपमध्ये ब्रिटनचा संरक्षण बजेट सुमारे ७८ अब्ज डॉलर आहे. ब्रिटनने २०२७ पर्यंत GDPच्या २.६ टक्के खर्च संरक्षणासाठी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूणच, Defence Budget २०२६ मधून भारत आपली लष्करी ताकद अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत असल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन