Budget 2026: बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय ?

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय व्यावसायिक, विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योगांसाठी अनेक प्रस्तावांची घोषणा करण्यात आली.

या घोषणेअंतर्गत पशुपालकांना सुलभ कर्ज आणि अनुदान दिले जाईल. तसेच पशुधन उत्पादक संघटनांच्या (LPOs) निर्मितीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या सामूहिक ताकदीला बळकटी दिली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी मागे राहू नये म्हणून सरकारने 'भारत विस्तार' नावाचे बहुभाषिक एआय (AI) टूल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या योजना :

- पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान
- काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार
- ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार
- दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार
- चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार; नारळ संशोधन केंद्र स्थापन करणार
- ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवणार
- चंदन लागवडीला प्रोत्साहन
- आयातीवर अवलंबित्व कमी करणार
- मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार
- सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणार
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम