Budget 2026 : अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलं मोठं गिफ्ट, मुंबई–पुणे-हैदराबाद रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशभरात सात उच्चगती रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद, हैदराबाद–चेन्नई, दिल्ली–वाराणसी आणि वाराणसी–सिलीगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांचा समावेश आहे.


देशातील या उच्चगती रेल्वे प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.त्यामुळे दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असून रोजगार निर्मितीलाही गती मिळेल असा विश्वास मंत्री सितारमण यांनी व्यक्त केला.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, "भारताला जागतिक बायो-फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी, मी पुढील ५ वर्षांत १०,००० कोटी रुपयांच्या खर्चासह बायो फार्मा शक्ती योजनेचा प्रस्ताव मांडत आहे. यामुळे बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक परिसंस्था निर्माण होईल."


दरम्यान वाराणसी आणि पटना येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी कॉरिडॉरमध्येही हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. या कॉरिडॉरचा उद्देश कनेक्टिव्हिटी, गतिशीलता आणि प्रादेशिक आर्थिक वाढीला चालना देणे हा आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका

Share Market Updates : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव असूनही सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुधारणेचा कल

नवी दिल्ली : आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजार नीचांकी पातळीवरून

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले