Budget 2026 : दही - साखर भरवून राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्या अर्थमंत्री सीतारमण यांना शुभेच्छा

नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.


अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी बजेट सादर करण्यासाठी त्यांनी एक आकर्षक कांजीवरम साडी निवडली आहे. ही साडी तामिळनाडूमधून आली आहे. लवकरच तामिळनाडू येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.





एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :


अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.


रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढणार :


व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. जानेवारीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

Comments
Add Comment

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात