एआयच्या सल्ल्यामुळे ४५ वर्षीय व्यक्ती आजाराच्या विळख्यात

नवी दिल्ली : वैद्यकीय उपचारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आंधळेपणाने विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे गंभीर उदाहरण समोर आले आहे. एआय प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या सल्ल्यानुसार डॉक्टरांचा सल्ला न घेता एचआयव्ही प्रतिबंधक औषधे घेतलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ‘स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम’चा सामना करावा लागला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा एका ‘हाय-रिस्क’ व्यक्तीसोबत लैंगिक संपर्क आला होता. त्यानंतर एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, याची माहिती घेण्यासाठी त्याने एका एआय प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. एआयने दिलेल्या माहितीनुसार, त्याने स्थानिक मेडिकल स्टोअरमधून ‘पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस’ औषधांचा २८ दिवसांचा कोर्स खरेदी केला आणि कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय औषधे सुरू केली.


सात दिवसांनंतर त्याच्या शरीरावर परिणाम जाणवायला सुरुवात झाली. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत ‘स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम’ असल्याचे निदान झाले. हा आजार औषधांच्या घातक रिअॅक्शनमुळे होतो आणि त्वचा तसेच श्लेष्मल त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. रुग्णाला आयसीयूमध्ये उपचार देण्यात येत आहेत.


उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाने घेतलेली काही औषधे आता नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलमध्ये वापरली जात नाहीत. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार एचआयव्ही प्रतिबंधक औषधे केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि आवश्यक चाचण्यांनंतरच दिली जातात. या घटनेमुळे औषध विक्रीवरील नियंत्रण आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी एआयवर वाढत्या अवलंबनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :

Odisha Earthquake: ओडिशात भूकंपाचे धक्के, लोक घरातून बाहेर धावले; दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओडिशा: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. रात्री सुमारे