विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबत केंद्र सकारात्मक

पनवेल (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची अधिकृत माहिती संसदेत देण्यात आली. त्यामुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले असून प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेकदा तीव्र आंदोलन आणि पाठपुरावा केल्यानंतर ही एक महत्त्वाची घडामोड झाली.


संसदेत प्रस्तावाचा स्वीकार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारला (नागरी विमान वाहतूक मंत्रालय) अधिकृतपणे प्राप्त झाला असल्याची पुष्टी करण्यात आली. केंद्र सरकारने स्पष्ट केले की, राज्याने पाठवलेल्या 'लोकनेते दि. बा. पाटील' या नावाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यावर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाचे अधिकृत नामकरण ही एक निश्चित प्रशासकीय प्रक्रिया आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकार आता यावर अंतिम तांत्रिक मोहोर उमटवण्याच्या तयारीत आहे.नवी मुंबईच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. या जमिनी महाराष्ट्राच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून नियोजित नव्या शहराच्या उभारणीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस यांच्या भाजप शिवसेना सरकारने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे, हा केवळ आमचा आग्रह नसून तो प्रत्येक भूमिपुत्राचा हक्क आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेली ही माहिती आपल्या लढ्याला मिळालेली महत्वाची पावती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानिक जनतेच्या भावनांची कदर करत असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

बटलर - गिलमुळे गुजरातचा सलग दुसरा विजय, लखनौने गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या लोकांना पुढे आणणार, सुनेत्रा पवारांची घोषणा

'कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार' बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी

Ashok Kharat Case : चिंचोक्यांपासून खडे बनवणारा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर

नाशिक : बाजारात सुमारे १०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांपासून आकर्षक खडे तयार करून ते ‘मंत्रबद्ध’

मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

मुंबई : लोखंडवाला–मागाठाणे १२० फूट डी.पी. रोड या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १२ एप्रिल रोजी कांदिवली पूर्व येथील

Asha Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज

Shiv Sena : पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या ताकदीत वाढ; भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके आणि आमदार तानाजी सावंतांचा पुतण्या शिवसेनेत

पंढरपूर : “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी