वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनही राजकीय पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर पदासाठी एकूण ४ जणांचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांनी आणि भाजप तर्फे एका सदस्याने अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी एकूण ३ जणांचे ५ अर्ज दाखल झाले आहेत. यात बविआतर्फे २ तर भाजपच्या एका नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे.


वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप- शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांनीही प्रत्येकी २ अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण ७ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी बविआतर्फे मार्शल लोपीस, कन्हैया भोईर यांनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी एक अर्ज दाखल केला असून एकूण ५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी बविआतर्फे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीने सदर निवडणूक अविरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, की आणखी काही चमत्कारिक घडणार आहे हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार

Gold Buying Tips : सोनं खरेदी करताना 'या' 7 चुका टाळा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. सणासुदीच्या

Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

पाण्यात कोणता पदार्थ मिसळावा आणि हे पाणी प्यायल्याने काय फायदा होईल जाणून घ्या. तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरचे

Kalashtami 2026 : आज मासिक कालाष्टमी; भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

भगवान शिवाचे उग्र स्वरूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मासिक