चौपदरीकरणामुळे चर्चेत आलेल्या मीरा भाईंदर उड्डाणपुलाची वाहतूक पोलिसांनी केली पाहणी, सुचवले बदल

मीरा रोड : दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेमुळे मीवर भाईंदर येथे उभारण्यात आलेल्या तिसरा दुमजली उड्डाणपूल रचनेमुळे वादात अडकला होता.अखेर वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चार मार्गिकेचा पूल पुढे थेट दोन मार्गिकेचा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होईलच शिवाय भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मीरा-भाईंदर परिसरात मेट्रो-९ चे खांब उभारल्यानंतर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने परिसरात तीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी दोन पूल आधीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानदरम्यानचा सुमारे १८०० मीटर लांबीचा तिसरा पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे.


मात्र, या पुलाची रचना चार मार्गिकांवरून अचानक दोन मार्गिकांमध्ये येत असल्याने सोशल मीडियावरून तीव्र टीका सुरू झाली. वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत, अपघातांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पुलाची सखोल पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.


पाहणीनंतर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुभाजकांची रचना, दिशादर्शक व सूचना फलक, वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी चिन्हांकन यांचा त्यात समावेश आहे. या सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.


एमएमआरडीएने पुलाच्या रचनेत कोणताही धोका नसल्याचा दावा केला असून, भविष्यात भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या टीकेनंतर आता अतिरिक्त सुरक्षात्मक उपायांवर भर दिला जात आहे.


सर्व अंतर्गत कामे आणि वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर हा दुमजली उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Maha e-HRMS : देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली राज्यात कार्यान्वित

मुंबई : देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आतापर्यंत साडेबारा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दहा हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र

DCM Eknath Shinde : कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत

मुंबई : शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून,

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे

Nashik : पिंपळगाव बसवंतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Nashik : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थापूर्वी नाशिकमध्ये ‘सांस्कृतिक कुंभ, देशभरातील भक्तिपरंपरांचा अनोखा संगम

Nashik Kumbh Mela : महासिंहस्थाच्या आधी नाशिकमध्ये भक्ती, संगीत आणि भारतीय संतपरंपरेचा अनोखा ‘सांस्कृतिक कुंभ’ अनुभवायला