RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, त्यांची विचारधारा आणि सामाजिक योगदान असलेला हा चित्रपट आहे.


२०२५ मध्ये RSS ने आपल्या स्थापनेची शताब्दी पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ‘शतक’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या संघाच्या दीर्घ प्रवासाची कथा हा चित्रपट मांडत आहे. अलीकडेच दिल्लीतील RSSच्या केशव कुंज कार्यालयात या चित्रपटातील ‘भगवा है अपनी पहचान’ या गीताचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. हे गीत प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी गायले आहे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे गीत चित्रपटाची भावना आणि मूलभूत विचार प्रभावीपणे व्यक्त करते.



टीझरमधून पहायला मिळते की, हा चित्रपट संघाबाबत अनेक वर्षांपासून असलेल्या गैरसमजांवर आणि भ्रमांवरही प्रकाश टाकतो. केवळ चर्चा किंवा वादांपुरते मर्यादित न राहता, इतिहास, विचारधारा आणि संघटनात्मक विकास योग्य संदर्भासह मांडणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. स्वातंत्र्यलढ्यातील RSSचे योगदान, विविध काळात लादलेली बंदी आणि आणीबाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची झलकही यात पाहायला मिळते.


चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष मल्ल म्हणाले, “हा चित्रपट माझ्यासाठी एका वैयक्तिक प्रवासासारखा आहे. संशोधनादरम्यान संघाशी संबंधित असे अनेक पैलू समोर आले, ज्यांवर सहसा चर्चा होत नाही. समाजात पसरलेल्या गैरसमजांना प्रामाणिकपणे समोर आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट होते.”


चित्रपटाचे निर्माते वीर कपूर यांनी सांगितले, “हा चित्रपट पुस्तके, आणि उपलब्ध साहित्याच्या आधारे तयार करण्यात आला आहे. संघाच्या वैचारिक परंपरेला एकत्र गुंफून ती सिनेमाई भाषेत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. १८७५ ते १९५० या काळात सुरू झालेल्या अनेक चळवळींपैकी संघ ही एकमेव संघटना आहे जी अखंडपणे पुढे जात राहिली. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ‘ना रुके, ना थके, ना झुके’ ही चित्रपटाची टॅगलाईन याच भावनेचे प्रतीक आहे.”


या चित्रपटाचे सह-निर्माते आशीष तिवारी असून, तो ADA 360 डिग्री एलएलपी सादर करत आहे. अनिल डी. अग्रवाल यांच्या संकल्पनेवर आधारित आणि आशीष मॉल दिग्दर्शित हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

विपुल अमृतलाल शाह यांची ‘"द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड"’चा टीझर रिलीज़; यावेळी कथा अधिक गडद आणि हादरवून टाकणारी

विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून येणारा द केरला स्टोरी 2 हा चित्रपट आहे. आँखें, नमस्ते लंडन, सिंह इज़

‘भूत बंगला’चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने उधळली कॉमेडीची धमाल, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

प्रियदर्शन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांच्या

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण

Mardaani 3 Twitter reviews : राणी मुखर्जीचा बॉक्स ऑफिसवर धमाका! 'मर्दानी ३' ला प्रेक्षकांची पसंती; धमाकेदार प्रतिक्रिया समोर

मुंबई : बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मर्दानी ३' आज ३० जानेवारी रोजी

केरळ स्टोरी २ चा टिझर यावेळी अधिक गडद; हिंदू मुलींवर निशाणा....

मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण