ऐन रिलीजच्या तोंडावर केरळ स्टोरी २ सिनेमात सेन्सॉर बोर्डाने सुनावले चक्क १६ बदल

मुंबई : लव्ह जिहाद या मुद्द्यावर आधारित असलेला केरळ स्टोरी या सिनेमाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ऐन प्रदर्शनाच्या तयारीत असताना सेन्सॉर बोर्डाने चक्क १६ बदल आणि कट्स सुचवले आहेत.


लव्ह जिहाद या विषयावरच्या चित्रपटात बऱ्याच वेळा मुलींना मारहाण, अश्लील कृत्ये, चुंबन यांसारखे दृश्ये दाखवलेली असतात. जी सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा ओलांडतात आणि ते भाग सेन्सॉर बोर्ड चित्रपटातून काढून टाकण्याचा किंवा कट् करण्याचा आदेश देतात. असेच काही सीन्स केरला स्टोरी २ या सिनेमात असल्याने बोर्डाने चक्क १६ कट्स सुचवले आहेत. सीन्स जितके वगळता येतील तितके कमी करण्याचे आदेश दिले आहेत.


बोर्डाच्या आदेशामुळे या सिनेमातील चुंबन सीन्स ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. बलात्काराची दृश्ये सुद्धा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत, तसेच काही मारहाणीच्या सीन्स मधेही कट्स केले आहेत. काही डायलॉग्स बदलेले गेलेत तर काही शब्दांना म्यूट करण्यात आलंय. तसेच डिस्लेमार स्क्रीन टाइम आणि त्यासोबत व्हॉइस ओव्हर सुद्धा २ मिनिटांनी वाढवण्यास सांगितलं आहे. निर्मात्यांना डायलॉगच्या होशोबाने स्क्रिप्ट जमा करण्याचे आणि चित्रपटात दाखवलेल्या काही सत्य घटनांची योग्य कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.


विपुल शाहांची निर्मिती आणि कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसेच यामध्ये उल्का गुप्ता, आदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २७ जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत