Sonalee Kulkarni Brother Death: सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली कुलकर्णीच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. यासंदर्भात सोनालीनं स्वतः पोस्ट करत माहिती दिली आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा चुलत भाऊ अनिरुद्ध याचं निधन झालं आहे. भावाच्या जाण्यानं खचलेल्या अभिनेत्रीनं समाज माध्यमावर इमोशन पोस्ट शेअर केली आहे. अनिरुद्धच्या जाण्यानं सोनालीसह तिच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आमचा अन्नूमा... हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी निघून गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तिकडे वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. अध्यात्मिक, निरागस आणि जीव लावणारा असा मला माहीत असलेला सर्वात निर्मळ मनाचा व्यक्ती तू होतास. तुझं प्रत्येकासोबत छान नातं होतं. सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केलंस. सगळी गाणी तुला माहीत होती. तबला अगदी छान वाजवायचास...आणि तुझ्या हातचा चहा... तू जसा होतास तसाच राहिलास आणि सगळ्यांना प्रेम दिलंस. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती".


सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सोनालीच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी सोनालीच्या पोस्टवर कमेंट करुन तिचं सांत्वन केलं आहे.


दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यासोबतच सोनाली कुलकर्णीनं मल्ल्याळम फिल्ममध्येही काम केलं आहे.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये