रेडी जि. प. मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रीतेश राऊळ यांना अपक्ष उमेदवार काशिनाथ नार्वेकर यांचा जाहीर पाठिंबा

वेंगुर्ले :रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रीतेश राऊळ यांना अपक्ष उमेदवार केरवाडी येथील काशिनाथ नार्वेकर यांनी पाठिंबा जाहीर केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जात आहेत. यातच वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे नार्वेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नव्हता. दरम्यान शिवसेनेचे नेते, आमदार दीपक केसरकर यांच्या बरोबर बोलणे झाल्यानंतर त्यांच्या शब्दाचा मान ठेवत आपण महायुतीचे उमेदवार प्रितेश राऊळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असे जाहीर केले. यामुळे रेडी मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिव वालावलकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षांतर्गत समन्वय साधला गेला आणि महायुतीची ताकद अधिक बळकट झाली. महायुतीच्या या निर्णयामुळे रेडी मतदारसंघात शिवसेना, भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असून या निवडणुकीत महायुतीला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर या घडामोडींची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला वेग आला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : फळपीक विम्यातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा

- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा मुंबई :

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या

Sindhudurg News : देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाहून मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा