मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने नाही तर तब्बल वर्षभर नाशिककरांना या वाहतूक कोंडीतूनच प्रवास करावा लागणार आहे. नाशिक शहरात एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामं सुरू असल्याने ही परिस्थिति निर्माण झाली आहे.


लवकरच नाशिक द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरच्या कामास सुरूवात होणार असल्याने ही वाहतूक कोंडी होणर आहे. तसेच इतर मार्गांवरची कामेही सुरू होणार असल्याने नाशिककरांना निदान वर्षभरतरी या वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्याची शक्यता कमीच आहे.


शहरात एकाचवेळी तब्बल ३० रस्त्यांची व ४ उड्डाणपुलांची विकास कामे, दुरुस्ती, आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यात द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू असेल. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेने पर्यायी मार्गांची सोय केली आहे.


पर्यायी मार्ग कोणते ?


द्वारका चौकात येणाऱ्या मोठ्या वाहनांसह एसटीबसेस, सिटी लिंक बसेसलाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरातून जाण्यासाठी या वाहनांना फेम थिएटर, पुढे बडाळागाव गाव कलानगर सिग्नल आणि पुढे पाथर्डी फाटा अथवा लेखानगरमार्गे मुंबई नाका असा पर्याय आहे. काही वाहनांना वडाळगावाजवळून साईनाथनगर चौफुली आणि पुढे इंदिरानगर अंडरपास व पुढे मुंबईनाका हा रस्ता देण्यात आला आहे. जाणाऱ्या वाहनांचा ताणही इंदिरानगर जॉगींग ट्रॅक रस्त्याने रवीशंकर मार्ग आणि डीजीपीनगर असा राहिल, जड अवजड वाहनांना दिवसभर शहराबाहेर रोखून धरण्याची व्यवस्था नसल्याने या वाहनांना बसेसबरोबर इंदिरानगर भागातूनच जावे लागेल.
Comments
Add Comment

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १००

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित अटकेत, तपास सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात करवीर

विपुल अमृतलाल शाह यांची ‘"द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड"’चा टीझर रिलीज़; यावेळी कथा अधिक गडद आणि हादरवून टाकणारी

विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून येणारा द केरला स्टोरी 2 हा चित्रपट आहे. आँखें, नमस्ते लंडन, सिंह इज़

जारो इन्स्टिट्यूटची तिसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी

मुंबई : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च लिमिटेडने आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत

‘भूत बंगला’चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने उधळली कॉमेडीची धमाल, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

प्रियदर्शन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांच्या