अजित दादांच्या विमान अपघात वैमानिकांबाबत समोर आले हे धक्कदायक खुलासे .... सस्पेंड, अल्कोहोल टेस्ट......

पुणे : महाराष्ट्राचे लाडके अजित दादा आज अनंतात विलीन झाले. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित दादांचा बारामती धावपट्टी शेजारी दुर्दैवी विमान अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला. अजित पवारांसह त्यांच्यासोबाबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकाचा आणि एक क्रू मेंबर, वैमानिक आणि सहवैमानिक यांचाही मृत्यू झाला.


दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यायचंय सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका अनुभवी वैमानिकाच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



कॅप्टन सुमित याबद्दल खुलासे


या घटनेशी संबंधित वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा अनुभव मोठा असला, तरी यापूर्वी दोन वेळा १३ ,मार्च २०१० मध्ये एका देशांतर्गत उड्डाणापूर्वी, दिल्ली विमानतळावर, दिल्ली-बंगळूरु (S२ - २३१ ) या उड्डाणापूर्वी ते ब्रेथ अ‍ॅनालायझर (BA) चाचणीत मद्यप्राशन स्थितीत कर्तव्यावर आढळल्याची अधिकृत नोंद असल्याचे समोर आpilotsले आहे. नागरी विमान वाहतूक यंत्रणांच्या अहवालानुसार, दिल्ली विमानतळावर तसेच २०१७ मध्ये पुन्हा एका उड्डाणादरम्यान नियमभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.


दुसऱ्या प्रकरणानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने कठोर निर्णय घेत तीन वर्षांसाठी वैमानिक परवाना निलंबित केला होता. विमान वाहतूक क्षेत्रात ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जाते. मात्र, निलंबन कालावधी संपल्यानंतर संबंधित वैमानिक पुन्हा सेवेत दाखल झाल्याची माहिती आहे.


दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी ऑपरेटरकडून या वैमानिकाची नियुक्ती कशी करण्यात आली, यावरही चौकशीची सुई वळली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या व्हीआयपी उड्डाणांसाठी वैमानिकांची निवड करताना पार्श्वभूमी तपासणीचे निकष पाळले गेले होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


बारामती येथे झालेल्या घटनेत विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग न केल्याने ‘गो-अराउंड’ घेण्यात आला आणि त्यानंतर अपघात घडला. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक कारणांबरोबरच मानवी चुकांची शक्यताही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे व्हीआयपी विमानसेवांमधील सुरक्षेच्या यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमकं जबाबदार कोण हे स्पष्ट होणार आहे

Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा