चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तालुक्यात शिवसेना -भाजप युती, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना अशी तिरंगी लढत होणार आहे. जि.प. ९ जागांसाठी २८, तर पं. स. १८ जागांसाठी ५५ असे एकूण ८३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या योगेश खांडेकरांचा अपक्ष अर्ज राहिल्याने उमरोली गटात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उबाठा सेनेच्या तीन अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने शिरगांव, अलोरे गटात पक्षावर उमेदवारच नसल्याची नामुष्की ओढवली.


तालुक्यात एकूण २७ जागांसाठी भाजप १०, तर शिंदेसेना १८, राष्ट्रवादी सर्व २८, ठाकरे सेना २२ जागा लढवत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस अवघ्या एकेक जागा लढवत असून बसपा, वंचितनेही दोन उमेदवार उभे केले. या निवडणुकीत उबाठातर्फे तालुक्यातील मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात सर्वच ठिकाणी उमेदवार रिंगणात असले तरी चिपळूणच्या अर्ध्या भागात मात्र या पक्षाला सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच मंगळवारी शिरगांव गट आणि गण तसेच पिंपळी खुर्द गणातील तीनही अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पक्षाचा उमेदवारच राहिलेला नाही.


शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने कोकरे गटातून किशोर घाग, तर उमरोली गट भाजपला सोडला गेल्याने नाराज झालेल्या सेनेच्या योगेश खांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. मात्र घाग यांनी अर्ज मागे घेतला, तर खांडेकर रिंगणात कायम राहिले आहेत.

Comments
Add Comment

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा.....

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

कोकणच्या विकासासाठी निधीचा धडाका; गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - गृहमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन