Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघाताचे रहस्य उलगडणार! 'ब्लॅक बॉक्स' सापडला; तपासाला वेग

बारामती : बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने संपूर्ण देश हळहळला. गुरुवारी सकाळी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने तपास प्रक्रिया सुरू केली असून, या अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शोधण्यात यश आले आहे. या बॉक्समुळे विमानाचा संपर्क का तुटला आणि लँडिंगच्या वेळी नक्की काय घडले, याचा उलगडा लवकरच होणार आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांनी आपला जीव गमावला. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की हवामानातील बदलामुळे, याचे गुपित आता या ब्लॅक बॉक्समध्ये कैद असलेल्या माहितीमुळे (Flight Data Recorder) समोर येईल. हा ब्लॅक बॉक्स आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून, लवकरच या भीषण दुर्घटनेचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.



अखेर 'नारिंगी' ब्लॅक बॉक्स सापडला


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातग्रस्त 'लिअरजेट ४५' विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा स्फोट होऊन पाचही प्रवाशांचा अंत झाला होता. या भीषण दुर्घटनेमागचे नेमके कारण काय? विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले की मानवी चुकीमुळे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता या ब्लॅक बॉक्समधून मिळण्याची शक्यता आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) या दोन यंत्रणांना एकत्रितपणे 'ब्लॅक बॉक्स' म्हटले जाते. नावाप्रमाणे हा बॉक्स काळा नसून ठळक नारिंगी रंगाचा आहे, ज्यामुळे ढिगाऱ्यात तो शोधणे सोपे झाले. लिअरजेट ४५ हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार बनवलेले असूनही हा अपघात कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी यातील डेटा आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हा बॉक्स भीषण आग, स्फोट आणि उच्च तापमानातही सुरक्षित राहील अशा पद्धतीने डिझाइन केलेला असतो. ब्लॅक बॉक्समधून मिळालेला डेटा भविष्यातील विमान अपघात रोखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. बारामतीतील विमान अपघाताचं कारण शोधण्यासाही आता हाँ ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरले. काल हे विमान धावपट्टीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याआधीच कोसळलं अशी माहिती समोर आली. खाली कोसळताच स्फोट होऊन मोठी आग लागली आणि पाचही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



अजित दादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारल करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, बीजेपी अध्यक्ष नितिन नवीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. इतरही अनेक राजकीय नेते, मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)