Ajit Pawar Passes Away : विमान अपघाताची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडे- राजेश टोपे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सर्वात अगोदर माझ्याकडे आली होती, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले की; "आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर स्टोअर रुममध्ये कामाला आहे. त्याने मला सकाळी फोन करुन अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितले. फक्त विमानाचे शेवटचे टोक दिसत आहे बाकी सर्व विमान जळून गेले असेही त्याने यावेळी सांगितले.







बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.


‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना : 


अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीत उपस्थित राहणार आहेत. २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सकाळी गदिमा सभागृहापासून दादांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानचा आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

महापालिकेत एमआयएमचे महत्व वाढले

सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या या 'खास' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन

अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक

धावपट्टीचे आधुनिकीकरण होण्यापूर्वीच काळाची दादांवर झडप

विमानतळावर आधुनिक यंत्रणा बसवण्याचे चार महिन्यांपूर्वीच निर्देश पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

दादांना बारामतीत आज अखेरचा निरोप

कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे