Ajit Pawar death Baramati : ज्या मातीत रोपटं रुजलं, तिथेच आज विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज अंत्यसंस्कार; बारामतीकरांना शोक अनावर

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती येथील गोजुबावी परिसरात लँडिंग दरम्यान त्यांचे विमान कोसळले आणि भीषण स्फोट झाला. या हृदयद्रावक घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचाही अंत झाला. एक 'मास लीडर' आणि शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित दादांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि विकासाची धडाडी यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून जनसागर लोटण्याची शक्यता असून, बारामती परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.



बारामतीत जनसागर लोटणार


अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असून, बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काल संध्याकाळी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे साश्रू नयनांनी अंत्यदर्शन घेतले. सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. निवासस्थानापासून मुख्य अंत्ययात्रेला सुरुवात होईल. काटेवाडी येथून निघालेली ही यात्रा 'ग. दि. मा. सभागृहा'मार्गे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे मार्गस्थ होईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंतिम विधी पार पडतील. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यातून समर्थक बारामतीकडे येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून काटेवाडी आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. लाडक्या 'दादांना' अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त केला आहे.



अमित शाह, फडणवीसांसह बडे नेते अजितदादांना वाहणार श्रद्धांजली


या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर असून बारामती विमानतळावर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राज्यावर शोककळा पसरली आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांसह अनेक राज्यांचे मंत्री अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. व्हीआयपींच्या आगमनासाठी बारामती विमानतळावर पोलिसांच्या फौजेसह NDRF चे पथकही तैनात करण्यात आले आहे. गर्दी आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान मैदानापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Comments
Add Comment

Soak Almonds : दिवसाची सुरुवात भिजवलेल्या बदामाने का करावी? जाणून घ्या आरोग्यासाठीचे ७ जबरदस्त फायदे

मुंबई : सकाळची सुरुवात पौष्टिक आहाराने केली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिवसभर शरीरावर आणि मनावर दिसून येतो. अशाच

Maharashtrachi Hasya Jatra : स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा मानाचा मुजरा

मुंबई(Mumbai) : नेहमीच काहीतरी वेगळं, नावीन्यपूर्ण आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारं सादर करणारी सोनी

IND vs ZIM 1st T20 Vaibhav Suryavanshi : १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची जगभर चर्चा! १८ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम

- झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत तुफानी खेळी; सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा

Iran Attack : इराणकडून जॉर्डन-कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा दावा

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्याने गुरुवारी कुवेत आणि जॉर्डनमधील

Sikkim Tunnel Accident : सिक्कीम टनल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 25 झाला

गंगटोक : सिक्कीममधील एनएचपीसीच्या तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन

Oil Prices : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलबाजारावर परिणाम! इराण, अमेरिका तहाच्या विलंबामुळे तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या; ब्रेंट क्रूड ९६ डॉलरपार

- हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर संकट; भारतावरही होणार परिणाम नवी दिल्ली : मध्य