दिल्ली : सामूहिक बलात्काराच्या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली. चिमुकल्या मुलीला नूडल्स देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबाबत अल्पवयीन मुलांनीच गँगरेप करण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
दिल्लीतील भजनपूर भागात ही घटना घडली असून. १०, १३, आणि १४ वर्षाच्या मुलांनी ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. घटनेच्या काही तासांपूर्वी पीडित मुलीला तिच्या वडिलांनी चॉकलेट देऊन घराबाहेर सोडले होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून तीन आरोपींनीं मुलीला नूडल्स देण्याचे आमिष दाखवत एका बिल्डिंगमध्ये सामूहिक बलात्कार केला. आरोपीनी पीडित मुलीचे हात बांधून आणि तोंड दाबून तिच्यावर हा धक्कादायक प्रकार केला. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोचली. तिची ती अवस्था बघून कुटुंबीय घाबरले.
आरोपीचा शोध
मुलीला विश्वासात घेऊन कुटुंबीयांनी विचारले असता तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलानेच हा प्रकार केल्याचे कळले.
मुलीची अवस्था
मेडिकल रिपोर्ट मधून समोर आले की मुलगी आता चालू शकत नाही, मुलीच्या आईनेही सांगितले की मुलगी उठली किंवा बसली तर तिला प्रचंड त्रास होतोच शिवाय रक्तस्त्राव ही होत आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर तिसऱ्याच शोध सुरु आहे