मोहित सोमण: एकीकडे दिवसेंदिवस मेटल शेअर्समध्ये वाढ होत असताना आज हिंदुस्थान झिंक शेअर्समध्ये मात्र ३% घसरण झाली आहे.दुसरीकडे चांदीच्या ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) मध्ये रेकोर्ड ब्रेक वाढ झाली असताना अनिल अग्रवाल यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र ३% पातळीवर घसरण झाली आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उद्योगसमुहाने आपल्या हिंदुस्थान झिंक या उपकंपनीतील १.५९% हिस्सा (भागभांडवल Stake) विकण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांनी तेजीतही आज नकारात्मक कौल दिला आहे. ओएफएस (Offer for sale OFS) अंतर्गत या समभागांच्या विक्रीची घोषणा कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये केली होती. ६८५ रूपये प्रति शेअरसह हा सौदा कंपनीने निश्चित केला. ज्यामध्ये खरेदीदारांना ६% सवलतीसह ही फ्लोअर प्राईज ऑफर करण्यात आली होती. त्यामुळे ४५८९.५० रूपये प्रति शेअरसह हा सौदा होणार आहे.
या सौद्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ३% घसरण झाली जेव्हा सिल्वर ईटीएफमध्ये नव्या उच्चांकावर झेप घेतली गेली आहे. काल ७ ते ८% वाढीनंतर जागतिक अस्थिरतेत चांदीच्या दरात जगभरात आणखी ८.६७% वाढ झाली ज्यामध्ये आज चांदी प्रति किलो ३८०००० रूपयांच्या घरात पोहोचली. एकीकडे वाढलेली औद्योगिक मागणी व अस्थिरतेत स्थिर सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीला प्राधान्य गुंतवणूकदारांकडून दिले जात असताना मोठ्या प्रमाणात महिन्यात केवळ सिल्वर नाही तर मेटल शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच ही चांदीत विक्रमी वाढ झालेली असताना मात्र हिंदुस्थान झिंक शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११.५२ वाजता शेअर ०.२३% घसरत ७२५.५० रूपयांवर व्यवहार करत होता. गेल्या तीन दिवसात चांदीच्या दरात ४५००० रूपयांची वाढ झाली आहे. हिंदुस्थान झिंक शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात ५.१८% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात १७.२९% वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात शेअर्समध्ये ६७.४७% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर शेअर्समध्ये १८.५६% वाढ झाली आहे.