मोहित सोमण: आज शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज (Shadowfax Technologies Limited) कंपनीच्या आयपीओ आज सूचीबद्ध (Listing) झाला आहे. मात्र आयपीओला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला असून आयपीओ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सूचीबद्ध होतानाही देखील कंपनीला नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. १९०७.२७ कोटींच्या आयपीओतील शेअर आज प्राईज बँड तुलनेत ९% कोसळत केवळ ११२.६० रूपयांवर शेअर सूचीबद्ध झाला. कंपनीने आयपीओसाठी १२४ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता. तर कंपनीच्या आयपीओला एकूण २.८६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. ज्यामध्ये २.४३ पटीने रिटेल गुंतवणूकदारांकडून, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.८८ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले होते. आयपीओआधी कंपनीने ८६५.०२ कोटींचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त झाला होता.२० ते २२ जानेवारी दरम्यान हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आज तो बीकेसी, एनएसईवर सूचीबद्ध झाला आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २३ जानेवारीला करण्यात आले होते. रिटेल गुंतवणूकदारांना किमान १२० शेअर्सचा वाटा (Lot) म्हणजेच १४८८० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. ICICI Securities Limited कंपनीने आयपीओसाठी बूक लिडिंग मॅनेजर म्हणून काम केले असून Kfin Technologies Limited कंपनीने आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम केले. १९०७ कोटींच्या पब्लिक इशूपैकी यामध्ये १००० कोटी मूल्यांकन असलेला फ्रेश इशू असून उर्वरित ९०७ कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) देण्यात आले होते.
आयपीओआधी कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ७१६८.८५ कोटी रूपये होते. जून २०१६ मध्ये स्थापन झालेली शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही भारतातील एक लॉजिस्टिक्स सोल्यूशन प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी ई-कॉमर्स एक्सप्रेस पार्सल वितरण आणि अनेक मूल्यवर्धित सेवा प्रदान करते.त्यांच्या सेवांमध्ये ई-कॉमर्स आणि डी२सी (थेट ग्राहकांपर्यंत) वितरण, काही तासांत किंवा त्याच दिवशी हायपरलोकल आणि क्विक कॉमर्स, आणि शॅडोफॅक्सच्या फ्लॅश ॲपद्वारे एसएमएस व वैयक्तिक कुरिअर सेवा यांचा समावेश आहे. ही कंपनी ग्राहकांना लॉजिस्टिक्स सुविधा आणि लाइनहॉल भाड्याने घेते तर नियंत्रणासाठी लागणारी ऑटोमेशन आणि यंत्रसामग्री स्वतःच्या मालकीची ठेवते.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला ३० सप्टेंबर २२०५ पर्यंत २१.०४ कोटींचा करोत्तर नफा (PAT) मिळाला होता जो ३१ मार्च २०२५ पर्यंत ६.०६ कोटी होता. तर ईबीटा (EBITDA) ३१ मार्च २०२५ मधील ५६.१९ कोटी रुपये तुलनेत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ५६.१९ कोटी होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditures), इतर देयकासाठी, ब्रँडिंग, विपणन (Marketing), इतर संस्थेचे अधिग्रहण (Acquisition) व दैनंदिन कामकाजासाठी (Daily General Corporate Purposes) करण्यात येणार आहे.