नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण कुरापती काढल्या असून, भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवणे हाच त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे.’, अशी जोरदार टीका भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केली. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला निकटचा संबंध ठामपणे अधोरेखित केला.