तेलाच्या शेअर्समध्ये आज मजबूत १०% वाढ 'या' कारणांमुळे वाढत आहे ओएनजीसी,ऑईल इंडियाचे शेअर

मोहित सोमण: आज जागतिक तेल बाजारात अडथळे (Disruption) आल्यानंतर तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्याचा परिणाम म्हणून भारत सरकार उपक्रमांतर्गत असलेल्या पीएसयु तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये १०% इंट्राडे उच्चांकावर वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात ओएनजीसी, ऑईल इंडिया यांसारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज मोठी वाढ झाली कारण वृत्तानुसार हिवाळी वादळामुळे उत्पादन विस्कळीत झाल्याने आणि अमेरिकेच्या गल्फ कोस्टमधून होणारी कच्च्या तेलाची निर्यात तात्पुरती थांबल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. अधीच भूराजकीय अस्थिरता असताना या कारणाची भर पडल्यामुळे तेलाचे शेअर उसळले.काल रात्रीच जागतिक तेलाच्या किमतीत जवळपास ३% उसळल्या ज्यानंतर ही तेजी दिसून आली आहे. सकाळच्या सत्रात ब्रेंट क्रूड फ्युचर्स ३.०२% वाढून ६७.५७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले आहे तर काल यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड २.९% वाढून ६२.३९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले.


ब्रोकरेज कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार,जागतिक मिडल-डिस्टिलेटमधील टंचाईमुळे ज्यात रशियन उत्पादनांच्या प्रवाहावर युरोपियन युनियनने घातलेल्या निर्बंधांचा समावेश आहे. रिफायनिंग मार्जिनला आधार मिळताना ब्रोकरेजच्या मते, ६५ डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी कच्च्या तेलाची किंमत किरकोळ मार्जिन आणि एलपीजीच्या अर्थशास्त्रासाठी अनुकूल आहे. आयईए (IEA) ला २०२६ पर्यंत तेलाच्या मागणीच्या वाढीत घट आणि अतिरिक्त पुरवठ्याची अपेक्षा आहे ज्यामुळे तेल विपणन (Marketing) कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमतीचा धोका कमी होईल. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विश्लेषकांच्या मते अपस्ट्रीम कंपन्यांची कमाई कच्च्या तेलाच्या किमतींशी जवळून जोडलेली असते. ब्रेंट क्रूडच्या किमतीत प्रति बॅरल १ डॉलरची वाढ झाल्यास अपस्ट्रीम कंपन्यांच्या वार्षिक ईपीएसमध्ये सुमारे २% वाढ होऊ शकते. माहितीनुसार, गेल्या सत्रात जवळपास ३% वाढ झाल्यानंतर आज सकाळी WTI कच्च्या तेलाचे फ्युचर्स ६२ डॉलर प्रति बॅरलच्या वर होते त्यामुळे या किमती सुमारे चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.


तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास निफ्टी ऑइल अँड गॅस निर्देशांकात गेल्या एका आठवड्यात २.९% उसळला असला तरी हा निर्देशांक गेल्या एका महिन्यात १.७% घसरला आहे. आणि गेल्या एका वर्षात त्यात १५.५% वाढ झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात अपस्ट्रीम तेल कंपन्यांचे शेअर्स कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांसह संवेदनशील राहू शकतात. त्या तुलनेत ही किंमत समायोजित (Adjusted) होऊ शकते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठीचे धोरणात्मक पाठबळ आणि अनुकूल चलन हालचालींमुळे ऑइल इंडिया आणि ओएनजीसीसारख्या कंपन्यांच्या कमाईच्या दृष्टिकोनालाही मदत मिळू शकते असे तज्ज्ञ म्हणत आहेत. आज दुपारी ३.०५ वाजेपर्यंत ओएनजीसी कंपनीच्या शेअर्समध्ये ८.६६% वाढ झाली असून तर ऑईल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ९.४९% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

कमी दृश्यमानता ठरली अपघाताचे कारण ?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८

CM Fadnavis Dy CM Eknath Shinde Meet Sunetra Pawar in Baramati : सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् मुख्यमंत्री-राज्यपालांची स्तब्धता; बारामतीतील ते दृश्य पाहून महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानातील 'ती' क्रू-मेंबर; बाबा, दादांशी तुमचं बोलणं करून देईन..पिंकीचा तो शब्द शेवटचाच ठरला!

बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने गौतम अदानींनी शोककळा व्यक्त केली

मुंबई:अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी बारामतीजवळ झालेल्या अजितदादांसह सहा व्यक्तींच्या

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांवर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी येणार!

बारामती : २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे