भारत युरोपियन करारानंतर रूपयाची उसळी कालच्या रुपयातील निचांकी पातळीवरून रूपयाची ११ पैशाने उसळी,'या' कारणामुळे

प्रतिनिधी: कालच्या भारत व युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय करार झाल्यानंतर रूपयाला मागणी वाढली. तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवतानाच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याने सुरूवातीच्या विनिमय दरात रूपयाने ११ पैशांने उसळी घेतली आहे. त्यामुळे एकूणच कमजोर डॉलर आणि भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या (FTA) पार्श्वभूमीवर रुपया सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी मजबूत होऊन ९१.५७ वर पोहोचला आहे. त्यामुळे काल रुपयाने आपल्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवरून उसळी घेतली असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २२ पैशांनी मजबूत होऊन ९१.६८ (तात्पुरता) वर बंद झाला होता.


बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी मजबूत होऊन ९१.५७ वर पोहोचला होता. डॉलर निर्देशांक घसरल्याने आणि युरोपसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे मिळालेल्या आश्वासकतेमुळे रुपयाला आधार मिळाला. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलर निर्देशांक नरमल्याने आणि युरोपसोबतच्या दीर्घ-प्रतीक्षित व्यापार करारामुळे रुपयाची सुरुवात उच्च पातळीवर झाली.


सुरूवातीच्या विनिमय दरात म्हणजेच आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.६० रूपयांवर उघडला होता. त्यानंतर त्यात काही सुधारणा होऊन तो ९१.५७ रूपयांवर पोहोचला ज्यामुळे मागील बंदच्या तुलनेत ११ पैशांची वाढ नोंदवली गेली आहे.सुरुवातीच्या व्यवहारात रूपयाने अमेरिकन चलनाच्या तुलनेत ९१.६६ चा स्तरही गाठला होता.


९२.०० ही पातळी युएस डॉलर- रूपयासाठी नजीकच्या काळातील एक महत्त्वाची आधार पातळी आहे. या पातळीच्या वर सातत्यपूर्ण हालचाल झाल्यास ९२.२०–९२.५० च्या श्रेणीकडे मार्ग मोकळा होऊ शकतो असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सीआर फॉरेक्स ॲडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबरी म्हणाले आहेत. पुढे पाबरी यांनी पुढे सांगितले की, बाजारात रिझर्व्ह बँकेची सततची उपस्थिती आणि डॉलरच्या नरमलेल्या पार्श्वभूमीमुळे या जोडीला स्थिरावण्यास मदत होऊ शकते आणि नजीकच्या काळात ती हळूहळू ९०.८०–९१.०० रूपयाच्या श्रेणीकडे परत येऊ शकते.


दरम्यान सुरूवातीच्या कलात सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.१३% घसरून ९६.०९ वर व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या बाबतीत जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स व्यवहारात ०.५३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६७.९३ डॉलरवर व्यवहार करत होते. या कराराला 'सर्व करारांची जननी' (Mother of All Trade) असे म्हटले जात आहे. या करारामुळे सुमारे २ अब्ज लोकांची बाजारपेठ निर्माण होईल. हा करार ब्रिटन, न्यूझीलंड आणि ओमानसोबतच्या अलीकडील व्यापार करारांनंतर झाला होता. आव्हाने कायम असली तरी विशेषतः भारतीय निर्यातीवरील अमेरिकेन अतिरिक्त शुल्क अनिश्चितता असल्याने युरोपियन युनियनसोबतचा हा करार जागतिक व्यापारात भारताच्या वाढत्या भूमिकेचा एक मजबूत संकेत देतो असे पाबारी यांनी पुढे म्हणाले.


विनिमय बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ३०६८.४९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. दरम्यान, भारत आणि युरोपियन युनियनने मंगळवारी मुक्त व्यापार करारासाठी (FTA) वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केली. या करारानुसार वस्त्रोद्योग, रसायने आणि पादत्राणे यांसारख्या अनेक देशांतर्गत क्षेत्रांना २७ देशांच्या गटात शुल्कमुक्त प्रवेश मिळेल, तर युरोपियन युनियनला कार आणि वाइनसाठी सवलतीच्या शुल्कावर भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment

सोन्याचांदीत आजही अनिश्चितेत तुफान वाढ सोने चांदी गगनाला भिडले 'हे' आहेत दर

मोहित सोमण: परवा सादर होणारा भारतातील अर्थसंकल्प, जागतिक अस्थिरता, भूराजकीय संकट, आर्थिक अनिश्चितता, युएस इराण

'अजित पवारांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला'

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला... मुंबई - आमचे

तेलाच्या शेअर्समध्ये आज मजबूत १०% वाढ 'या' कारणांमुळे वाढत आहे ओएनजीसी,ऑईल इंडियाचे शेअर

मोहित सोमण: आज जागतिक तेल बाजारात अडथळे (Disruption) आल्यानंतर तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्याचा परिणाम म्हणून

Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज

ACC Cement कंपनीचा तिमाही निकाल जाहीर करोत्तर नफ्यात ५४% घसरण

मोहित सोमण: अदानी समुहाची कंपनी म्हणून ओळखली जाणारी एसीसी लिमिटेड (ACC Limited) कंपनीचा आर्थिक तिमाही निकाल जाहीर झाला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार मुंबई : विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले