Ajit Pawar Plane Crash : अजितदादांवर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी येणार!

बारामती : २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या अंत्यसंस्काराकडे लागले आहे. ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिले, त्याच कर्मभूमीत उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडणार आहेत. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच देशातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या महान नेत्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या विशेष विमानाने बारामतीत दाखल होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.



उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत 'विद्या प्रतिष्ठान'वर होणार 'दादां'चे अंत्यदर्शन


उद्या, २९ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या हक्काच्या बारामतीत पार पडणार आहे. लाडक्या 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर उसळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे पार्थिव उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित पवारांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मोठे काम उभारलेल्या या संस्थेच्या प्रांगणातच त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करू शकतील. पवार कुटुंबाने कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी शांततेत विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित राहून आपल्या नेत्याचे दर्शन घ्यावे. अजित पवारांच्या देदिप्यमान राजकीय कारकिर्दीचा सन्मान म्हणून राज्य सरकारतर्फे त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन शासकीय इतमामात मानवंदना दिली जाणार आहे. पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून त्यांना शेवटची सलामी दिली जाईल. या विधीनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बारामतीमध्ये प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, वाहतुकीच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत. अजित पवार हे धडाडीचे नेते होते. राज्यातील असो किंवा केंद्रातील, प्रत्येक नेत्यांशी त्यांचे जवळचे आणि चांगले नाते होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोटो शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन देखील केला होता. दरम्यान, उद्या ते स्वत: बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहतील. तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहतील. या कारणास्तव बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आल्याची माहिती आहे.


"शब्दाचा पक्का आणि जनतेचा सखा" अशी ओळख असलेल्या आपल्या लाडक्या 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघा महाराष्ट्र आज बारामतीच्या दिशेने धाव घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रत्येकाच्या मनात आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्याची आर्त हाक आहे. उद्या, २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समर्थक बारामतीत दाखल होत आहेत. कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातून कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे निघाले आहेत. "आमचा आधारवड गेला" अशी भावना व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांना भररस्त्यातच रडू कोसळले आहे. बारामती शहरात सध्या पाय ठेवण्यालाही जागा उरली नसून, शहरातील प्रत्येक चौक आणि रस्ता आपल्या लाडक्या 'दादां'च्या आठवणीत सुन्न झाला आहे. अजित पवारांचे बारामतीशी असलेले नाते केवळ राजकीय नसून ते कौटुंबिक होते. आज बारामतीतील प्रत्येक घरातील चूल पेटलेली नाही. कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला असून, "आता आमचं कोण ऐकणार?" असा सवाल सामान्य जनता विचारत आहे. उद्याचा दिवस बारामतीसाठी अत्यंत कठीण असणार आहे, कारण उद्या या शहराचा 'लाडका दादा' कायमचा अनंतात विलीन होणार आहे.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passes Away : आता दादांना नेतोय पण..." पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेताना जय पवारांना अश्रू अनावर!

बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच

हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गुरुवारी बारामतीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी

CM Fadnavis Dy CM Eknath Shinde Meet Sunetra Pawar in Baramati : सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् मुख्यमंत्री-राज्यपालांची स्तब्धता; बारामतीतील ते दृश्य पाहून महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानातील 'ती' क्रू-मेंबर; बाबा, दादांशी तुमचं बोलणं करून देईन..पिंकीचा तो शब्द शेवटचाच ठरला!

बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

Shambhavi Pathak Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाची को-पायलट शांभवी पाठक कोण होती ? आर्मी ऑफिसरची लेक अन् १५०० तासांचा अनुभव...

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, या अपघातातील