शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची आतुरतेनं प्रेक्षक वाट पाहत आहेत. शाहरुख खानने त्याच्या किंग या चित्रपटाचा प्रोमो आणि रिलीज डेटची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकवर्गाची आतुरता वाढली आहे. 'किंग खान' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ जी रिलीज होणार आहे.  दरम्यान २४ जानेवारी रोजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन मोडमध्ये दाखवणारा प्रोमो रिलीज केल्यानंतर अनेकजण प्रभावित झाले आहेत.शाहरुख खान किंग ऑफ द रिंग्जच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे आता प्रोमो पाहूण सिद्ध होत आहे. हा चित्रपट 'जवान'प्रमाणेच खूप दमदार असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.


शाहरुख खानचा फर्स्ट लूक प्रदर्शित :
शाहरुख खाननं त्याच्या इंस्टाग्रामवर फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दमदार दिसत आहे. यात त्याने रक्ताने माखलेला पांढरा शर्ट घातला आहे, आणि तो रागानं एका इमारतीवर हल्ला करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये, शाहरुख खाननं संकेत दिला की, त्याचा करिष्मा पुन्हा एकदा पडद्यावर दिसेल. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. दरम्यान यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे, त्यामुळं हा चित्रपट देखील खूप धमाकेदार असणार असेही आता यूजर्स म्हणताना सोशल मीडियावर दिसत आहेत.





'किंग' चित्रपटाबद्दल :
तसेच चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय महत्वाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अर्शद वारसी सौरभ शुक्ला आणि राघव जुयाल हे देखील कलाकर आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये सुहानाची झलक दिसली नसली तरी, ती टीझरमध्ये असणार अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटातील सुहाना खानची भूमिका अद्याप उघड झालेली नाही. आता शाहरुख खानचा 'किंग'च्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या