Tuesday, January 27, 2026

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची आतुरतेनं प्रेक्षक वाट पाहत आहेत. शाहरुख खानने त्याच्या किंग या चित्रपटाचा प्रोमो आणि रिलीज डेटची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकवर्गाची आतुरता वाढली आहे. 'किंग खान' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ जी रिलीज होणार आहे.  दरम्यान २४ जानेवारी रोजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन मोडमध्ये दाखवणारा प्रोमो रिलीज केल्यानंतर अनेकजण प्रभावित झाले आहेत.शाहरुख खान किंग ऑफ द रिंग्जच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे आता प्रोमो पाहूण सिद्ध होत आहे. हा चित्रपट 'जवान'प्रमाणेच खूप दमदार असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.

शाहरुख खानचा फर्स्ट लूक प्रदर्शित : शाहरुख खाननं त्याच्या इंस्टाग्रामवर फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दमदार दिसत आहे. यात त्याने रक्ताने माखलेला पांढरा शर्ट घातला आहे, आणि तो रागानं एका इमारतीवर हल्ला करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये, शाहरुख खाननं संकेत दिला की, त्याचा करिष्मा पुन्हा एकदा पडद्यावर दिसेल. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. दरम्यान यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे, त्यामुळं हा चित्रपट देखील खूप धमाकेदार असणार असेही आता यूजर्स म्हणताना सोशल मीडियावर दिसत आहेत.

'किंग' चित्रपटाबद्दल : तसेच चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय महत्वाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अर्शद वारसी सौरभ शुक्ला आणि राघव जुयाल हे देखील कलाकर आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये सुहानाची झलक दिसली नसली तरी, ती टीझरमध्ये असणार अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटातील सुहाना खानची भूमिका अद्याप उघड झालेली नाही. आता शाहरुख खानचा 'किंग'च्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >