मोहित सोमण
जगभरात असे म्हणतात प्राथमिक सेवा गावोगावात असतील की नाही याची शाश्वती नाही. परंतु प्रत्येक स्त्रीच्या अंगावर दागिना लागतोच. इतके महत्व दागिन्यांचे भारतीय संस्कृतीत मानले जाते. दागिन्यांना भारतात तर अनन्य साधारण महत्त्व आहे ती केवळ सौंदर्य प्रसाधने नाही तर आयुष्यातील कमाईची पुंजीही असते. अशाच महत्वाच्या दागिन्यांतील किंमतीत जागतिक अस्थिरतेच्या दृष्टीने खूप मोठा फरक पडला आहे. खरे दागिने विंडो शॉपिंगपुरते उरले आहेत. दागिन्यांच्या आवरणातही एक मजा असते. ती प्रत कशीही असो पण सगळ्या वर्गातल्या लोकांना दागिने हवेहवेसे वाटतात यातच खरं दागिन्यांच्या मौल्याचे यश आहे. मात्र तत्पूर्वी सामान्य माणसांचा दृष्टिकोन हा दागिन्यांसाठी केवळ 'पारंपरिक सोने चांदी' इतकाच राहिला आहे. प्रत्यक्षात त्यात अनेक तंत्रज्ञान अस्तित्वात आहेत. पूर्वी प्रत्येकाला खरे सोने परवडेल का याची शाश्वती नव्हती. किंमतीच्या दृष्टीने ते परवडण्यासारखे नव्हते शिवाय खरेदी केले तरी ते प्रवास करताना जोखमीचे असायचे त्यामुळे अनेकांनी विशेषतः स्त्रियांनी प्रत्यक्ष दागिने घराबाहेर घालताना कायम बेंटेक्स अथवा तत्सम दागिन्यांनाच प्राधान्य दिले. किंबहुना या प्रकारच्या दागिन्यांचा बोलबाला होता जो नंतर रिवाज झाला. कालांतराने गरजा वाढू लागल्या उत्पन्न वाढले तसतसे दागिन्यांच्या दर्जालाही महत्व प्राप्त झाले. कालांतराने त्यात नवनवीन संशोधन झाले व संक्रमणे आली. त्यातील एक असेच एक संक्रमण जे आम्ही प्रत्यक्ष पाहिले. बोरिवली पश्चिम येथे सुरु झालेल्या मिलो जेवेल्स (Milo Jewels) या नव्या सीवीडी डायमंड ज्वेलरी तंत्रज्ञानाच्या दालनाला भेट दिली.खूप नव्या गोष्टी पुढे आल्या.
अनेकदा अपारंपारिक अथवा पर्यायी ज्वेलरी खरेदी म्हणजे एक तर अत्यंत स्वस्त अथवा अत्यंत कमी दर्जाची बेंटेक्स प्रमाणे असलेली ज्वेलरी हा आपला सर्वसाधारणपणे कौल असतो. पण याला प्रत्यक्ष छेद देत मिलो जेवेल्स संस्थापक भव्य शहा यांनी दिली आहे. नव्वदच्या दशकात सीवीडी (Chemical Vapour Deposition) हे तंत्रज्ञान हिरा निर्मितीसाठी सुरु झाले. पारंपरिक ज्वेलरी बनवण्यासाठी विशेषतः हिऱ्यांसाठी उत्खनन खाणीतून होते. मूळ स्वरूपात असलेल्या या हिऱ्याचे कटिंग, पॉलिशिंग हे प्रत्यक्षात करूनच त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मगच तो हिरा विकला जातो. एकतर दुर्मिळ हिरा व त्यातून त्याला पैलू पाडण्याचा अवास्तव खर्च यामुळे प्रचंड महाग किंमतीत विकला जाणारा हिरा हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. त्याला पर्याय म्हणून सीवीडी हे तंत्रज्ञान पर्याय ठरले. नव्वदच्या दशकात या सीवीडी तंत्रज्ञानात सुरुवात झाली असली तरी त्याला उभारी ही २००० नंतर आली. सीवीडी हे तंत्रज्ञान प्रामुख्याने असे तंत्रज्ञान आहे ज्यात हा हिरा खाणीतून न काढता केमिकल्स प्रक्रियेद्वारे हा हिरा बनवला जातो.पारंपारिक एचपीएचटी (HPHT) विपरीत सीवीडी तंत्रज्ञानामध्ये हिऱ्यांच्या थरात वाढवण्यासाठी व्हॅक्यूम चेंबर, हायड्रोकार्बन वायू आणि प्लाझ्माचा वापर केला जातो. तज्ञांच्या मते यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता आणि शुद्धता मिळते. अर्थातच त्या अपारंपारिक हिऱ्यातही विविध दर्जाच्या स्तराची उत्पादने अथवा हिरे बाजारात उपलब्ध होतात. केवळ हिराच नाही तर या तंत्रज्ञानाच्या आवरणातून सोन्याप्रमाणे दागिनेही बनवले जातात. तुम्ही जर अमेरिकेन डायमंड अथवा स्वस्तातील अपारंपारिक प्रकियेतील दागिने पाहिल्यास त्यांचा दर्जा अतिशय सुमार अथवा सरासरीच असतो. पण अशा अपारंपारिक दागिन्यांसाठी असलेल्या सीवीडी तंत्रज्ञानातील सर्वात प्रिमियम दर्जाचे हिरे व दागिने मिलो जेवेल्स बाजारात घेऊन ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत. केमिकल्स सहाय्याने लॅब्स मध्ये बनवलेल्या प्रिमियम दागिन्यांचे कलेक्शन सादर करुन मिलो जेवेल्सने बोरिवली पश्चिम येथे आपले तिसरे दालन मुंबईत उघडले आहे.
जेव्हा आम्ही भेट दिली त्यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते. माजी मिस इंडिया व कलाकार शिल्पा कटारिया या देखील उद्घाटनात उपस्थित होत्या. यावेळी संस्थापक भव्य शहा यांनी आपल्या दागिन्यांचे सादरीकरण करत इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. प्रामुख्याने यामध्ये रेडी सीवीडी तंत्रज्ञानातील हिरे व दागिने यांचे शेकडो प्रकार येथे उपलब्ध असल्याचे पहायला मिळाले.
भव्य शहा यांनी स्थापन केलेली, मिलो ज्वेल्स ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते. दागिन्यांच्या कारागिरीत सीवीडी (CVD) डायमंड तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यामधील प्रिमियम रेंजचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देते. जर प्रत्यक्षात तुम्ही हे दागिने पाहिल्यास पारंपारिक पद्धतीने असलेल्या हिरे व सीवीडी लॅब्समध्ये बनवलेले हिरे यांच्याकडे डोळ्यातून पाहिल्यास तुम्हाला फरक आढळून येणार नाही इतक्या काटेकोरपणे हे दागिने बनवले गेले आहेत. उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांना दागिन्यांचे दोन नमुने दाखवण्यात आले त्यातूनच उत्पादनातील दर्जा तरी आम्हाला सकारात्मक दिसला. आम्ही जेव्हा एक प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्याने बनवलेला आणि दुसरा नैसर्गिक हिऱ्याने बनवलेला बहुतेक उपस्थितांना त्यातील फरक ओळखता आला नाही, ज्यामुळे प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांविषयी आणि त्यांच्या गुणवत्तेबद्दल चर्चा सुरू झाली आणि आमचे शंकानिरसनही करण्यात यावेळी आले.
स्वाभाविकपणे या तंत्रज्ञानातही स्वस्त ते महाग दागिने उपलब्ध असले तरी मिलोने तर सीवीडी तंत्रज्ञानातील प्रिमियम रेंज बाजारात आणली आहे. तरीही जर खाणीतील हिरा व सीवीडी हिरा यांच्यातील प्रिमियम दरातही तुलना केल्यास कोट्यावधी रूपयांना येत असलेल्या हिऱ्यांच्या तुलनेत प्रिमियम दरातील सीवीडी हिरा जास्तीत जास्त ४०००० हजारांपर्यंत साधारपणे जातो इतका फरक किंमतीत जाणवतो. त्यामुळेच या तंत्रज्ञानात स्वाभाविकपणे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. बाजारातील हीच गरज ओळखून कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओत विस्तारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यामुळे मुंबईतील हे तिसरे स्टोअरचे उद्घाटन केले आहे. कंपनीला दोन दशकांचा अनुभव असताना मिलो जेवेल्सचे लॅब्समधील उत्पादन मुंबईत होत असताना ६०० हून अधिक सीवीडी मशीन्स असलेल्या आणि वार्षिक ५ दशलक्ष कॅरेटपेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेला कारखानाही नवसारी गुजरात येथेही कंपनीचा कारखाना आहे.१००० हून अधिक कुशल कारागीर आणि मुंबईतील सिपझ (SEEPZ) येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्राच्या सहाय्याने मिलो ज्वेल्स हिऱ्यांच्या निर्मितीपासून ते तयार दागिन्यांपर्यंत पूर्णपणे अनुभव ग्राहकांना थेट उपलब्ध करून देतो. प्रगत हिरे निर्मिती परिसंस्थांपैकी एक म्हणून या ब्रँडला वाढती उत्पादन क्षमता, गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठा साखळीच्या अखंडतेचा फायदा होतो. मुंबई व गुजरात येथे मिलो जेवेल्सचे नेटवर्क असल्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा पडत नाही. अत्याधुनिक लॅब्समधून केल्या जाणाऱ्या कटिंगमुळे या सीवीडी तंत्रज्ञानातील प्रिमियम दरही नियंत्रणात राहतो ज्यामुळे काही हजारात हिरा घेणे शक्य होते. याशिवाय आम्ही त्यांच्या कँटलॉगमध्ये असलेली विविध उत्पादनेही पाहिली.

त्यातून आमच्या निरिक्षणासह आलेल्या महत्वाच्या नोंदीनुसार जागतिक स्तरावरील म्हणून हा ब्रँड सुलभ लक्झरी,शाश्वत डिझाइन आणि समकालीन कारागिरीमध्ये रुजलेला दिसला. केवळ सणांसाठी नाही तर दैनंदिन जीवनात हे दागिने वापरले जाण्यासाठी त्यांची रचनाच तशी केली असल्याचे जाणवले. विविध प्रकारच्या डिझाईन्ससह विविध शैलीतील हिरे व दागिने तुम्हाला येथे पहायला मिळतात. खडे, हिरे अथवा तत्सम उत्पादन कुठलंही असो आवरण हे सीवीडी तंत्रज्ञानानुसार बनवले जाते त्यामुळे उत्पादनाचा खर्चही मर्यादित राहून त्यांच्या फिनिशिंगमध्ये प्रिमियम ठेवण प्रकर्षाने दिसते असे आम्हाला जाणवले.
उदाहरणार्थ एमराल्ड कोर्ट डायमंड अर्निंग, इंटरलॉग डायमंड रिंग, डायमंड ब्रेसलेट, ब्लू सफायर पिअर ड्रॉप नेकलेस, ओवल कट रिंग अशी शेकडो प्रकारची ज्वेलरी डिझायन आपल्याला तिथे पहायला मिळते. मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे चंदीगड, इंदोर, अहमदाबाद, जयपूर अशा विविध ठिकाणी कंपनीची दालने पसरलेली आहेत. आणखीही कंपनी विस्तारासाठी भव्य शहा प्रयत्न करत आहेत असे बोलताना जाणवून आले.
अर्थातच हे तंत्रज्ञान नवे नसले तरी ते पुन्हा नव्याने रिडिझाईन व रिफायनिंग करत मिलो जेवेल्सने बाजारात आणले आहे. प्रिमियम रेंजमधील सीवीडी आभूषणे ही मुंबईकरांसाठी अधोरेखित करण्याजोगी नवी बाब आहे. यासाठीच आम्ही दालनात भेट दिली. प्रामुख्याने लार्ज कलेक्शन असलेल्या या दालनात तुम्हाला विविध स्तरांवरील (किंमत व साईजनुसार) पाहायला मिळतील. सीवीडी तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा म्हणजे यातून खाणीसारख्या नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी पडतो. पाणी, जमीनीची धूप, इतर वारेमाप खर्च, निसर्गातील असंतुलन यासारख्या बाबी टाळता येतात. शाश्वत विकासातील ही एक महत्वाची बाब आहे ती ओळखून मिलो जेवेल्सने हे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे.
दागिन्यांचे नवे ट्रेंड व तंत्रज्ञान पाहता मुंबईकरांसाठी ही स्वस्तात दागिने खरेदीची ही संधी असेल यात शंकाच नाही. अशातच दागिन्यांच्या विक्रीसाठी कंपनीने आणखी रिटेल ज्वेलरी ब्रँड घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. त्यातील पहिली पायरी म्हणून बोरिवली येथील स्टोअर शांत अंतर्गत सजावट, निवडक संग्रह आणि आकर्षक खरेदीच्या वातावरणाद्वारे मिलोच्या दालनात एक वातावरण निर्मिती होत खरेदीसाठी आवश्यक ती वातावरण निर्माणही आढळली. विशेषतः सोप्या भाषेत ग्राहकांना येथे या तंत्रज्ञानाचे व उत्पादनांचे विवेचन येथील कर्मचारी करतात ही जमेची बाब वाटते. आर्थिकदृष्ट्या पाहिल्यास कंपनीने सध्या विस्तार प्रक्रियेत असल्याचे यावेळी म्हटले. भविष्यात कंपनीचा आयपीओ येण्याचीही शक्यता आहे.
एकूणच कंपनीच्या ताळेबंद व विस्तार व्याप्तीबाबत भाष्य करताना स्पष्ट वाढीचा आराखडा असलेल्या मायलो ज्वेल्सने लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी क्षेत्रात एक अग्रगण्य नाव म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करण्याचे ध्येय ठेवले आहे असे यावेळी म्हटले. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत संपूर्ण भारतात १०० स्टोअर्स उघडण्याच्या मानस कंपनीचा आहे. खास बाब म्हणजे या दागिन्यांवर ट्रेडिंग करता येणे आगामी काळात शक्य होणार आहे.
जसे आपण पारंपरिक दागिन्यांसाठी ट्रेडिंग करतो किंवा खरेदी विक्री करतो तसे या दागिन्यांवरही करता येणार आहे. अडीअडचणीला संकटप्रसगी या दागिन्यांची संबंधित स्टोअर मध्ये विक्री अथवा एक्सचेंज करता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार,या आठवड्यात कंपनी यासंबंधी ऑनलाईन व्यासपीठ बाजारात दाखल करणार आहे. सध्या या मिलो जेवेल्समधून खरेदी केलेल्या दागिने भविष्यात विकायचे झाल्यास त्याच पूर्वीच्या खरेदी किंमतीच्या पावतीवर म्हणजेच पूर्वीच्या खरेदी किंमतीवर हे दागिने विकता येणार आहेत. हा व्यवहार मिलोच्या संबंधित दालनात करता येऊ शकतो.
भव्य शहा यांनी आपल्या 'प्रहार' ला दिलेल्या प्रतिक्रियेत अधिक आर्थिक माहिती दिली नसली तरी ते आपल्या कंपनीच्या विस्ताराबाबत म्हटले,' प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे हे विज्ञान आणि भावना यांचा संगम आहे. ज्या पिढीसाठी शैलीइतकेच पृथ्वीचे महत्त्व आहे, त्यांच्यासाठी हे हिरे हा एकमेव तर्कसंगत पर्याय आहे. मायलो ज्वेल्समध्ये, आम्ही ही 'लक्झरीची भविष्यकालीन संकल्पना' भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी, सर्वत्र सुलभ आणि परवडणारी बनवण्यासाठी सर्वसमावेशकपणे कार्यरत आहोत. त्यासाठी आपली कक्षा रुंदावत आहोत' असे म्हटले.
सीवीडी तंत्रज्ञान हिरे यांच्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ सुरत गुजरात येथे आढळते. सर्वाधिक प्रमाणात सुरत, गुजरात येथे प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या उत्पादनात केंद्रात टाइप IIa हिरे तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते असे मानले जाते. किरा, भंडेंरी, ग्रीनलॅब्स, फिंगरग्रोन, रिद्धी कॉर्पोरेशन, मैत्री असे इतर प्लेअर देखील या उद्योगात कार्यरत आहेत. भारत केमिकल व्हेपर डिपॉझिशन (CVD) हिरा तंत्रज्ञानामध्ये जागतिक आघाडीवरचा प्लेअर या उद्योगात मानला जातो. या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेचे २०२८ पर्यंत ६०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ञ वर्तवतात.
उच्च-गुणवत्तेसह शाश्वत आणि परवडणारे कृत्रिम अथवा अपारंपारिक हिरे तयार करण्यावर या उद्योगाचे लक्ष केंद्रित असताना भारत व बाहेरही या उद्योगाला सध्याच्या कालखंडात बहारी येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाढत्या मागणीमुळे बाजारपेठेत इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या २ वर्षात वार्षिक १०५% वाढ या प्रकारात दिसून आली. यापूर्वी उपलब्ध माहितीनुसार, २०२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या बियाणे असलेल्या कच्च्या मालातील ५% आयात शुल्क काढून टाकण्यात आले आणि तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीसाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मद्रासला संशोधनासाठी २४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले ज्याचा फायदा सुरत सारख्या ज्वेलरी इंडस्ट्रीला होत आहे. दागिन्यांव्यतिरिक्त, भारतात तयार होणाऱ्या या सीवीडी प्रकारच्या हिऱ्यांचा वापर थर्मल मॅनेजमेंट (हीट स्प्रेडर्स), इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय निदान यांसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या उद्योगात भरारी घेतली जात असताना या नव्या प्रिमियम व किफायतशीर दरात दागिने हिरे उपलब्ध करून देण्यासाठी मिलो जेवेल्सने घेतलेला उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरू शकतो.