सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे


सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात जिल्हा परिषदेसाठी बांदा व पंचायत समितीसाठी शेर्ले बिनविरोध ठरल्याने जि.प. ८ व पंचायत समितीच्या १७ जागांवर लढत होणार आहे. यातील आंबोली व मळेवाड जि.प. तर, आंबोली, कोलगाव, विलवडे, इन्सुली, मळेवाड, न्हावेलीत शिवसेना व भाजपने एबी फॉर्म कायम ठेवल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.


यात जिल्हा परिषद ९ मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. याठिकाणी भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध ठरले. तर माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया रविंद्र मडगावकर विरुद्ध अपक्ष शिवानी नाईक यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश तळवणेकर यांच्यासह ३ अपक्षांनी माघार घेतली. यामुळे भाजपचे महेश सारंग विरूद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्यात लढत होणार आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून गुणाजी गावडे व चंद्रकांत कुबल यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे विक्रांत सावंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे. बहुचर्चित आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील घटक पक्ष भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म कायम ठेवल्याने येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंच्या विरोधात भाजपच्या शोभा गावडेंनी दंड थोपटले आहेत.


तळवडे मतदारसंघातून तब्बल ६ अपक्षांनी माघार घेतली. भाजपच्या बंडखोर प्रमोद गावडेंनी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकाणातून बाजूला होण्याचे संकेत देत लढतीतून माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे संदीप गावडे, उबाठाचे रूपेश राऊळ यांच्यासह भाजपचे बंडखोर अपक्ष गंगाराम ऊर्फ अमेय पै यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इन्सुलीत उबाठाच्या फिलीप रॉड्रिग्ज, माजी सभापती मानसी धुरी अशा तिघांनी माघार घेतली. यामुळे शिवसेनेचे झेवियर फर्नांडिस, अपक्ष नितिन राऊळ व भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा बंडखोर अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून एका अपक्षाने माघार घेतली असून प्रियांका नारोजी शिवसेना, भाजपच्या अपर्णा सातोसकर व अपक्ष सानिका शेवडे यांच्यात लढत होणार आहे. महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून अमेय आरोंदेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेनेचे सुदन कवठणकर यांच्यासह भाजपच्या बंडखोर माजी सभापती शर्वाणी गांवकर व अपक्ष सिद्धेश नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २२ जाणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर ९ पैकी लढत होणाऱ्या ८ जिल्हा परिषद मतदारसंघातून २० जण आपल नशीब आजमावत आहेत.

Comments
Add Comment

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय