मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीच्या दबावामुळे सेल ऑफ केले असले तरी सकाळी इंट्राडे स्तरावर ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांनी शेअरला मोठा प्रतिसाद देताना सत्राच्या सुरुवातीला तर ६% इंट्राडे वाढ शेअरने नोंदवली आहे. सकाळी ११ वाजता बँकेच्या शेअर्समध्ये ५.५२% वाढ झाल्याने शेअर १३२७.४० रूपयांवर व्यवहार करत आहे. बँकेने काल उशीरा प्रजासत्ताक दिनी तिमाही निकाल जाहीर केला. ज्यामध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २.९०% वाढ झाली होती. डिसेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६३०४ कोटीवरून ही वाढ ६४९० कोटींवर पोहोचली. तर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर ५% वाढ झाली असून ती १३६०६ कोटीवरून १४२८७ कोटींवर पोहोचली आहे.
तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३.२०% वाढ झाली असून ती वाढ १०५३४ कोटीवरून यंदाच्या तिमाहीत १०८७६ कोटीवर पोहोचली आहे. तर बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) तिमाही बेसिसवर (QoQ) ०.४४% वरून ०.४२% घसरण झाली आहे. तर स्थूल एनपीएत (Gross NPA) १.४६% वरून १.४०% वर घसरण झाली जी सकारात्मक बाब होती. उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या प्रोविजनिंगमध्ये ४.२% वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीतीलह२१५६ कोटी तुलनेत ती वाढत २२४६ कोटींवर वाढली आहे.
एकूणच स्थिर निव्वळ व्याज उत्पन्न (NII) आणि मजबूत शुल्क उत्पन्नामुळे बँकेची आर्थिक कामगिरी व स्थिती मजबूत झाली आहे. बँकेने चांगली CASA (Current Account Saving Account CASA) मध्येही वाढ नोंदवल्याने ठेवींमध्येही वाढ नोंदवली असून किरकोळ आणि लहान कर्जांच्या वितरणात सातत्याने वाढ झाल्यामुळे कर्ज वाटपातील वाढही नोंदवली आहे. तर एनपीएतही घसरण व प्रोविजनिंगमध्ये वाढ नोंदवल्याने बँकेच्या ताळेबंदीत चांगली कामगिरी असल्यचे दिसून येते. असेट क्वालिटीत सुधारणा झाली असताना गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीत वाढ केल्याने आज शेअर मोठ्या प्रमाणात उसळला होता. गेल्या ५ दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये १.७२%, एक महिन्यात ७.७४% व वर्षभरासाठी ४०.०१% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ४.१६% वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. विशेष म्हणजे कुठल्याही ब्रोकरेजने शेअरला 'विक्रीचा' कॉल दिलेला नाही.