उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून सुरवात

जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग


२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे राज्यभर घेणार प्रचार सभा


सातारा ( महाबळेश्वर) : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून त्यांची सुरवात आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आली.


या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा आणि रोड शो घेणार आहेत. निवडणुका म्हटल्या की शिंदे प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आल्याशिवाय राहणार नाही.


यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७१ प्रचार सभा घेतल्या होत्या, नगरपालिका निवडणुकीत ५४ प्रचार सभा घेतल्या होत्या, त्यानंतर नुकत्याच पार पाडलेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी २९ प्रचारसभा २० रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
आज तळदेव येथे पहिली सभा पार पडल्यानंतर उद्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा येथे त्यांची दुसरी प्रचारसभा पार पडणार आहे.


नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाचा हाच दबदबा कायम राखण्यासाठी शिंदे मैदनात उतरले असून, येत्या आठवडाभर आपल्या प्रचार सभांनी ते महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा एकदा पक्षाची यशस्वी घडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहेत.


Comments
Add Comment

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग