Chitra Wagh : 'आमच्याकडे संविधनाचं शस्त्र आहे ...' अंजली भारतीच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या

गायिका अंजली भारती यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "आमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधनाचं शस्त्र आहे, कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे." अशा शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिलं आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.


काय म्हणाल्या चित्रा वाघ ?


अंजली भारती नावाच्या बाईचा आताच एक व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा.. अशी चिथावणी देणं.. ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. अशी भाषा मानसीक विकृती असून या बाईवर आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. पुढे त्या म्हणाल्या; श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद| जय महाराष्ट्र| जय भीम.





नेमक प्रकरण काय ?


भंडारा येथील भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर खासदार संजय निरुपम यांनी हा व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच चित्रा वाघ यांनी गायिका अंजली भारती आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

“बाळासाहेबांचा स्वाभिमान विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी छातीचा कोट केला!”

“लाडक्या बहिणींच्या ताकदीवर 232 आमदार निवडून आणण्याचा इतिहास रचला; त्यामुळे विरोधकांची पोटदुखी

सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी

मुंबई : मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांतील महापौर पदावरून महायुतीत तणाव असल्याच्या चर्चा झडत असताना,

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू

मुंबई: महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये माननीय

नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील तोडक कारवाईविरोधात गेल्या दोन दिवसांपासून तीव्र

Pune News : आधी बेडरूममध्ये CCTV लावले मग दीर आणि सासरा मिळून... नाशिकमध्ये विवाहितेवर जीवघेणा हल्ला

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

जागतिक अस्थिरतेत चांदीचा नवा ऐतिहासिक विक्रम! २००८ जागतिक मंदीनंतर चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ एक दिवसात ८% उसळली

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत व युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय करार झाला असताना दुसरीकडे