लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या तेरापैकी चार तर पंचायत समितीच्या पाच उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ९ तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले.


लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी दाखल केलेले ४४ पैकी सर्वच्या सर्व अर्ज हे छाननीमध्ये वैध ठरले होते. जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी यापूर्वी शिवसेना भाजपा युतीकडून ४, शिवसेना उबाठा पक्षाकडून ६, रिपाई पक्षाकडून १, बसपा १, काँग्रेस १ असे एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या आठ जागांसाठी शिवसेना भाजप युती ८, उबाठा ८, काँग्रेसकडून ३, मनसे १, रिपाई १, बसपा ४, वंचित १ आणि अपक्ष पाच असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी दाखल असलेल्या जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठीच्या १३ पैकी चार उमेदवारांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. तसेच पंचायत समितीच्या ३१ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ९ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.


निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-आसगे जि.प. गट - अनन्या राजेशिर्के (उबाठा), मनिषा लाखण (शिवसेना), भांबेड जि.प. गट विनिता गांगण (शिवसेना), अचला विश्वासराव (उबाठा). साटवली जि.प.गट लीला घडशी (शिवसेना), मनिषा जाधव (काँग्रेस), गवाणे जि.प. गट- आनंद कांबळे( बसपा), चेतन दळवी (उबाठा) आणि संतोष रेवाळे (शिवसेना). त्याचप्रमाणे पंचायत समिती गणासाठी रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे- आसगे पंचायत समिती- मानसी आंबेकर (शिवसेना), श्रावणी कांबळे (बसपा), आसावरी मांडवकर (उबाठा). वेरवली खुर्द पंचायत समिती - साक्षी चव्हाण (शिवसेना), निलिमा जाधव (उबाठा) आणि मानसी पवार (अपक्ष), प्रभानवल्ली पंचायत समिती गण- आनंद कांबळे (बसपा), राजेंद्र घडशी (उबाठा), उमेश पत्की (शिवसेना) आणि संकेत घाग (अपक्ष). भांबेड पंचायत समिती गण- शैलेश खामकर (भाजपा), किरण रेवाळे (मनसे), युवराज हांदे (उबाठा) आणि सचिन बेर्डे (अपक्ष), वाकेड पंचायत समिती गण- रसिका मेस्त्री (शिवसेना) दक्षता राजापकर (उबाठा). साटवली पंचायत समिती गण- आदेश आंबोळकर (शिवसेना), रमेश कदम ( उबाठा) आणि उज्ज्वल पवार (बसपा). गवाणे पंचायत समिती गण- दिपाली साळवी (शिवसेना) आणि पायल साळवी (उबाठा), खानवली पंचायत समिती गण- चंद्रकांत गीतये (बसपा), प्रथमेश बोडेकर (काँग्रेस), लक्ष्मण मोर्ये (उबाठा), यशवंत वाकडे (शिवसेना) आणि संजय रेवाळे (अपक्ष). याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.


पेंडखळे पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल सुर्वे यांची माघार; महायुतीला पाठिंबा


रत्नागिरी जिल्ह्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी यांची महायुती झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तसेच आ. प्रसाद लाड, आ. किरण सामंत यांच्या सूचनेनुसार व ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल करंगुटकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर याच्या विनंतीस मान देऊन पेंडखळे पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रफुल्ल सुर्वे यांनी मंगळवारी उमेदवार अर्ज मागे घेतला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपण आपल्या सहकाऱ्यांसह मतदार संघात मतदारांचा अभिप्राय घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी मतदार संघातील मतदारांनी मागील निवडणुकीत आमच्याकडून प्रयत्न कमी पडले याची आठवण करून देत यावेळी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली व तुम्ही निवडणूक लढवा, असा आग्रह धरला. माझ्या मतदार संघातील लोकांचा आग्रह व प्रतिसाद पाहून त्यांच्या विनंतीला मान देत मी मतदार संघाच्या विकासासाठी या पंचायत समिती गणातुन अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. महायुतीचा धर्म पाळत आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

पनवेल महापालिकेचा डंका, १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम

पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स

रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा

महायुतीची वर्चस्वासाठी तर महाविकास आघाडीची अस्तीत्वासाठी लढाई  नरेंद्र मोहिते रत्नागिरी : तब्बल आठ वर्षांनी