मेट्रो लाईन ७ ए प्रकल्पाचा मार्ग मोकळा

अप्पर वैतरणा जलवाहिनी यशस्वीरीत्या वळवली


मुंबई : मुंबई मेट्रो लाईन ७ ए प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, २४०० मिमी क्षमतेच्या अपर वैतरणा जलवाहिनीचे सुरक्षित व अचूक वळविणे पूर्ण करण्यात आले आहे. या टप्प्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वाकडे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


या कामादरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेसोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत सूक्ष्म नियोजन आणि उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे हे गुंतागुंतीचे काम पार पाडले. महानगरपालिकेच्या नियोजन विभागासह आऊटसाईड सिटी ट्रंक मेन्स, हायड्रॉलिक इंजिनीअर कार्यालय आणि के/ईस्ट वॉर्ड अशा विविध विभागांच्या संयुक्त समन्वयातून हा महत्त्वाचा टप्पा यशस्वी करण्यात आला. निश्चित करण्यात आलेल्या अल्प कालावधीतील शटडाऊनमध्ये जलवाहिनी स्थलांतराचे काम वेळेत पूर्ण करून तत्काळ जलपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी गैरसोय झाली. या यशस्वी टप्प्यामुळे मेट्रो लाईन ७ए प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असून, मुंबईकरांना अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत

वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली

राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या

रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक

मुंबई : आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल

राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीती मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि

पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल सचिन धानजी मुंबई : पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिम कल्पना