कडोंमपातील ४ नगरसेवकांविरुद्ध उबाठाची हरवल्याची तक्रार

सखोल चौकशीची मागणी


कल्याण : उबाठाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाने पोलीस ठाण्यात हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात अर्ज देत, संबंधित नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपास करण्याची मागणी केली आहे.


नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे का, की अपहरणाचा प्रकार घडला आहे, याबाबत सखोल चौकशीची विनंती केली आहे. “जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या,” असे आवाहन करत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच तक्रार करण्यात आली असे स्पष्टीकरण शरद पाटील यांनी
दिले आहे.


राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संशय:
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी आलेल्या नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मनसेचे माजी आ. राजू पाटील, खा. श्रीकांत शिंदे आणि आ. नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे भाजप आणि उबाठाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू होती. अशा स्थितीत उबाठाचे चार नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने ते कोणाच्या दबावाखाली आहेत का? किंवा अन्य कुठल्या राजकीय डावपेचाचा भाग आहेत का? अशी शंका उपस्थित होत आहे.


कडोंमपा निवडणूक निकाल २०२६:


एकूण जागा: १२२


शिवसेना (शिंदे गट): ५३


भाजप: ५०


शिवसेना (उबाठा): ११


मनसे: ५


काँग्रेस: २


राष्ट्रवादी (शरद पवार गट): १

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक