Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या प्रभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून येथील पाणी प्रश्न सुटल्याचे नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी स्पष्ट केले. जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला असून भाजपने करून दाखवलं अशी चर्चा होत आहे.


दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता स्वतंत्र धरण असावे अशी मागणी नागरिकांनी केली असता भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रयत्न करत असून नक्कीच स्वतंत्र धरण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.


पूर्वेकडील पी अँड टी कॉलिनी येथील काही इमारतींना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलींद म्हात्रे यांच्याकडे येथील राहिवाशांनी आपली हि समस्या मांडली.


पी अँड टी कॉलिनी येथे काही इमारतीत पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशी वैतागले होते. येथील रहिवाशांनी भाजपा नगरसेविका ऍड.कविता म्हात्रे यांना पाणी समस्येबाबत माहिती दिली. नागरिकांच्या या गांभीर समस्येवर भाजपा नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. येथे एकच पाणी लाईन असल्याची माहिती मिळताच नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी पालिकेच्या पाणी पूरवठा विभागाकडे मागणी करुन आणखी एक पाण्याची लाईन मंजूर करून घेतली.



पी अँड टी कॉलिनी प्रभाग पाणी टँकर मुक्त होणार !


कॉलनीत पाणी नाही म्हणून पाणी टँकर मागवित असल्याने त्यांच्या खिशाला भुर्दन्ड बसत होता. पाणी टँकर मुक्त प्रभाग हे स्वप्न यामुळे पुर्ण झाले असे महिला सांगत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : आई-बाबा घराबाहेर पडले अन् घरी येताच पायाखालची जमीन सरकली, दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या